🕒 1 min read
हैद्राबाद : अमित शाह यांच्यासारखा गृहमंत्री मी पूर्वी कधीच पाहिला नाही. गृहमंत्र्यांनी देश चालवायचा असतो. पण अमित शाह छोट्या-छोट्या निवडणुका मॅनेज करण्यात व्यस्त आहेत. ते फक्त लोकांच्या घरी जेवण करायला जातात आणि फोटो काढतात. सध्याची देशाची परिस्थिती, सीमारेषा आणि अर्थव्यवस्था कुठे गेली? अशा शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत, तसे राजकीय टोलेबाजीला उधाण आलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचं सध्या चित्र आहे. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींसोबत कोरोना लशीबाबत झालेल्या एका बैठकीत सहभाग नोंदवला होता. पण यानंतर त्यांनी त्यांच्यावर टीका केली. लस कधी येणार हे कुणालाच माहीत नाही, पंतप्रधान फक्त भाषण देण्यात व्यस्त आहेत, अशी टीका बॅनर्जी यांनी केली.
दरम्यान, हैदराबादमध्ये यावेळी काहीतरी ‘अनपेक्षित’ पाहायला मिळू शकतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह पक्षाचे इतर दिग्गज नेतेही निवडणुकीच्या प्रचारासाठी हैदराबादमध्ये आहेत. या निवडणुकांवर भाजपने आपलं पूर्ण लक्ष केंद्रीत केलं आहे आणि त्यासाठी आपल्या सर्व साधनांचा वापर करण्याची तयारी केली आहे. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (GHMC) निवडणूक १ डिसेंबरला होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘त्यांच्या नावातच UT आहे मग U Turn बाबत आश्चर्य का वाटावे’
- ‘गरिबांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ते अतिशय हिरीरीने मांडणारा एक उमदा नेता आपल्यातून निघून गेला’
- ‘सर्वसामान्य घरातील माणूस स्वतःच्या कर्तृत्वावर आमदार होऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारत नाना’
- ‘मागून हल्ला केला, पुढून आले असते तर माझ्या यशने ३ जण तरी मारले असते’
- जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला – अजित पवार


