नांदेड : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार लवकर कोसळणार असं भाजपच्या अनेक नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. नुकताच महाराष्ट्रात सत्तांतरासाठी जुळवाजुळव पूर्ण झाली असून दोन महिन्यात भाजपची सत्ता आणण्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दानवे यांच्या या दाव्यानंतर चर्चांना उधाण आले आहे.
याला प्रत्युत्तर मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. नांदेडमध्ये झालेल्या मराठवाडा पदवीधर निवडणूक महाविकास आघाडीच्या सभेत महाविकास आघाडीचे सरकार 20 वर्ष टिकेल असा दावा केला. मात्र यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण यांच्यावर तोंडसुख घेण्याची संधी सोडली नाही.
अशोक चव्हाण आणि अजित पवार यांचे फ्यूज उडाले नाही तर महाविकास आघाडीचे सरकार 20 वर्ष टिकेल हे ही सांगायला सत्तार विसरले नाहीत.एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
दोन महिन्यात सरकार बदलणार.. रावसाहेब दानवे काय म्हणतात हे मला चांगलं माहित आहे. सरकार पाच वर्षे नाहीतर पंचवीस वर्षे टिकेल. हे दोघं एकत्र राहिले आणि उद्धवजी मुख्यमंत्री राहिले तर? ज्या दिवशी या लाईनमध्ये फॉल्ट आला फ्यूज उडाला तर त्यांची गरजही पडणार नाही असेही सत्तार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘ईडीची कारवाई ही ऑपरेशन कमळची सुरुवात’
- पंतप्रधान मोदी पुण्यात येणार मात्र ‘छोटे भाई’ उद्धव ठाकरे राहणार अनुपस्थित !
- प्रताप सरनाईक यांच्या ईडी कारवाईवर, सचिन सावंत यांचा फडणवीसांना थेट सवाल
- ‘मागून हल्ला केला, पुढून आले असते तर माझ्या यशने ३ जण तरी मारले असते’
- ईडीचा धडाका सुरूच : विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांची १० तास चौकशी


