Share

‘राष्ट्रवादी महाआघडीतून बाहेर पडणार नाही, भाजपने आता स्वत:च्या जीवावर सत्तेत येण्याची स्वप्ने बघावी’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २०१९ विधानसभांच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबत असलेला संसार मोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यानंतर, हे तीनचाकी सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत करून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

मात्र, आता या महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सामनासह विविध वृत्त वाहिन्यांना मुलाखत दिली आहे. पुढील दोन महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार पडून भाजपची सत्ता येणार असा दावा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला आहे. यावर देखील त्यांनी भाजपवर पलटवार केला आहे.

‘महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची एकदम वेगळी भूमिका राष्ट्रवादी पक्ष अजिबात घेणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजपने आता स्वत:च्या जीवावर सत्तेत येण्याची स्वप्ने बघावी. पण तीही त्यांना शक्य होणार नाहीत, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.’

‘आम्हाला हरवता येत नाही ना मग, बदनाम करा… या वृत्तीने भाजप वागत आहे. याच पंचवीस वर्षाच्या सहकाऱ्याने आमचा विश्वासघात केला, हे एकमेव आणि कधीही न विसरता येणारे शल्य आहे. भाजपा आता उपऱ्यांचा पक्ष झाला आहे. त्यांच्याच पक्षातले जुनेजाणते नेते त्यांनी बाजूला ठेवले आहेत’ अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!