औरंगाबाद : जालना रोडवरील मोंढा नाका परिसरातून महाविद्यालयात जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न रिक्षा चालकाने केला. रिक्षा चालकाचा संशय आल्याने तरुणीने चालत्या रिक्षातून उडी मारल्याने तरुणी या प्रकरणातून बचावली. मात्र यात तरुणीला गंभीर दुखापत झाली. यावेळी धावत जाऊन या तरुणीची मदत करणाऱ्या शिवसेना उपशाखाप्रमुख निलेश सेवेकर यांचा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पुष्पगुच्छ देऊन मंगळवारी (दि.३१) सत्कार केला.
मोंढा नाका येथून एक महाविद्यालयीन तरुणी रिक्षा मध्ये बसली. पुढे गेल्यावर संशय आल्याने रिक्षाचालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितले. परंतु तो रिक्षा अजूनच वेगाने घेऊन जाऊ लागला. शेवटी घाबरून त्या तरुणीने थोडे पुढे जात नाही तर चालत्या वेगवान रिक्षातून उडी मारत स्वतःची सुटका करून घेतली. परंतु रिक्षातून उडी मारल्याने तिला जबर मार लागला. तेथूनच ‘अॅब्युलन्स हेल्प रायडर्स ग्रुप’ मधील सक्रिय सदस्य तसेच शिवसेनेचे शाखाप्रमुख निलेश सेवेकर आकाशवाणी कडे जात असताना हा सर्व प्रकार त्याच्या नजरेस पडला.
निलेशने जखमी अवस्थेतील मुलीला रस्त्याच्या कडेला घेऊन जात तिला हिम्मत देण्याचा प्रयत्न केला व तिची विचारपूस करत तिच्या घरच्यांना संपर्क साधला. यामुळे सर्वत्र निलेश यांचे कौतुक होत आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते निलेश सेवेकरचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अॅड. आशुतोष डंख, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्याला बंदिवान केल्याचा रेकॉर्ड मुख्यमंत्र्यांच्या नावावर’, भाजपचा टोला
- ‘राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे हल्लेखोर फेरीवाल्याला प्रसाद देणार’ ; अविनाश जाधव आक्रमक
- अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधील घरावर अज्ञातांकडून दगडफेक
- सोमय्यांचा गंभीर आरोप! ‘खा.भावना गवळींनी ७० कोटींची ट्रस्ट त्यांचा पीए सईद खानच्या नावे केली’
- … मग अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या फेरिवाल्यांवर तर कठोर कारवाई केलीच पाहिजे – नांदगावकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

