Share

सोमय्यांचा गंभीर आरोप! ‘खा.भावना गवळींनी ७० कोटींची ट्रस्ट त्यांचा पीए सईद खानच्या नावे केली’

Published On: 

नाशिक : माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. सोमय्यांच्या तक्रारीनंतर वाशिम येथील शिवसेनच्या खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खासदार गवळींच्या ५ संस्थांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले. त्यानंतर काही सवाल ‘ईडी’नंही उपस्थित केले आहेत. त्यानंतर सोमय्या यांनीही याप्रकरणात गवळींच्या ट्रस्ट संदर्भात काही गंभीर आरोप केलेत. भावना गवळी यांनी ७० कोटींची ट्रस्ट गैरपद्धतीनं त्यांच्या ‘पीए’च्या नावावर केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या यांनी नाशिक येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्रांग कंपनीची पाहणी केल्यानंतर भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी खासदार भावना गवळी यांच्याबाबत अनेक खुलासे केले.

ते म्हणाले, ‘भावना गवळी यांनी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, ट्रस्टचं परिवर्तन महिला उत्कर्ष प्रतिष्ठान प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये केलं आहे. ते करताना त्यांनी जी कागदपत्रं वापरली त्यात गैरप्रकार करण्यात आल्याची तक्रार माझ्याकडे आली होती. खोट्या पद्धतीनं ट्रस्टचं रुपांतर कंपनीत करण्यात आलं आहे. त्यामुळे या गैरप्रकाराचा तपास व्हायला हवा अशी आमची मागणी आहे. या ट्रस्टमध्ये ७० कोटींची संपत्ती जी ट्रस्टची होती ती भावना गवळींनी त्यांच्या पीए सईद खानच्या नावावर केली आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला.

कोण आहेत भावना गवळी?
भावना गवळी यांनी वयाच्या २४ व्या वर्षी लोकसभेत प्रवेश केला होता. यानंतर २००४, २००९, २०१४ आमि २०१९ असा सलग पाचवेळा त्यांनी लोकसभेत विजय मिळवाला. माजी खासदार स्व. पुंडलिकराव गवळी यांच्याकडून भावना गवळी यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. पुंडलिक गवळी यांच्या त्या सर्वात लहान कन्या आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी लहान वयातच राजकारणात प्रवेश केला. या कालावधीत त्यांनी यवतमाळ वाशिम मतदारसंघातील अनेक समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे लोकांनी त्यांना भरभरून मतं दिली.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!