मुंबई : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर देखील जबर मार लागला असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कल्पिता पिंपळे यांच्या अंगरक्षकाचंही एक बोट कापलं आहे. अमरजित यादव असे आरोपी फेरीवाल्याचे नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.
यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाष्य करताना कठोर कारवाईची मागणी केली आहे. ‘फेरिवाल्यांविरोधात सरकारनं कारवाई केली पाहिजे. कायद्याची भीती त्यांना वाटली पाहिजे. अनधिकृत फेरिवाल्यांवर कारवाई गरजेची आहे. आमच्यावर दहिहंडी फोडली म्हणून कारवाई केली ना, मग अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या फेरिवाल्यांवर तर कठोर कारवाई व्हावी,’ अशी मागणी देखील नांदगावकर यांनी केली आहे.
राज ठाकरेंनी घेतली पिंपळेंची रुग्णालयात भेट !
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राज ठाकरे यांनी आज रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली. राज ठाकरे यावेळी म्हणाले कि, “मी आश्वासन वगैरे काही दिलेलं नाही. मी फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. लवकर बरं व्हा एवढंच सांगितलं आहे.”
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले असे दोन प्रकार आहेत. आंदोलन जे होतं ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात होतं. जे काय घडलं त्याचं दु:ख आहेच, पण काळ सोकावतोय. अशाप्रकारची हिम्मत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत, न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली, त्याला कठोर शिक्षा होईल असं वाटतंय, असं राज ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘रामाची नियत खराब होती जयकुमार गोरेची चांगली आहे’ ; भाजप आमदारचे वादग्रस्त विधान
- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
- ‘आम्ही परंपरा जपतोय; राणेंच्या घराबाहेर हजारो लोक जमले तेव्हा मात्र गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली नाही’
- ‘…तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो’; फडणवीसांच महत्वाचं विधान
- ‘भाजपा आता रामाच्या चारित्र्याचे ही लिंचिंग करत ; हिंमत असेल तर गोरेंवर कारवाई करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

