मुंबई: भाजपचे आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाना साधत त्यांना पावणे २ वर्षात महाराष्ट्राला बंदीवान केल्याचा रेकॉर्ड हा उद्धवजी ठाकरे यांच्या नावावर लिहिला जाईल, असे दुर्दैवी चित्र असल्याचे म्हणत त्यांना टोला लगावला आहे. ठाकरे सरकार केंद्राच्या पत्रावरून राजकारण करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच २ वर्षांपासून कोरोनाच्या नावाने जनतेला घरात बसून ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांना सणांना नाही तर कोरोनाला विरोध असल्याचे म्हटले असे आहे तर मग बार, रेस्टोरेंट , नाईट क्लब का चालू आहेत असा सवाल करत त्यांनी राज्य सरकारने मृत्यूचे आकडे लपविले असल्याचा आरोप केला आहे. केंद्राने लसीकरण वाढवण्याचे सांगितले होते. मात्र अजूनही राज्यातील आरोग्य सेविकांचे लसीकरण झाले नाही. याचे उत्तर ठाकरे सरकारने द्यावे. अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.
गेल्या दिड पावणे दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने, ठाकरे सरकारने, सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत, पावणे 2 वर्षात महाराष्ट्राला बंदीवान केल्याचा रेकॉर्ड हा उद्धवजी ठाकरे यांच्या नावावर लिहिला जाईल, असे दुर्दैवी चित्र आहे! @BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/ckkNmFimol
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 1, 2021
ठाण्याच्या महापौर आणि विधान परिषदेच्या आमदाराला नियमबाह्य लस का देण्यात आली असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला आहे. त्यामुळे गेल्या दिड पावणे दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत, पावणे 2 वर्षात महाराष्ट्राला बंदीवान केल्याचा रेकॉर्ड हा उद्धवजी ठाकरे यांच्या नावावर लिहिला जाईल, असे दुर्दैवी चित्र निर्माण झाल्याचे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाना साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना नियमावलीचं पालन करत तामिळनाडूसह दिल्लीमधील शाळा होणार सुरु
- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- गांधी परिवाराची बदनामी करणारा व्हिडिओ केल्याप्रकरणी पायल रोहतगी विरोधात पुण्यात गुन्हा दाखल


