Share

‘राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे हल्लेखोर फेरीवाल्याला प्रसाद देणार’ ; अविनाश जाधव आक्रमक

Published On: 

मुंबई : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर देखील जबर मार लागला असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कल्पिता पिंपळे यांच्या अंगरक्षकाचंही एक बोट कापलं आहे. अमरजित यादव असे आरोपी फेरीवाल्याचे नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.

या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राज ठाकरे यांनीही कल्पिता पिंपळे यांना आश्वासन दिलं आहे की, तुम्ही बरे व्हा बाकी जबाबदारी आमची असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे पिंपळे यांच्याबद्दल घेतलेली जबाबदारी आम्ही पार पाडू. आम्ही धडा कसा शिकवणार हे कुणालाही सांगायची गरज नाही. अनेक लोकांना त्याचा अनुभव आहे. राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याला प्रसाद देऊ, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.

दरम्यान आज राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली. राज ठाकरे यावेळी म्हणाले कि, ‘अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले असे दोन प्रकार आहेत. आंदोलन जे होतं ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात होतं. जे काय घडलं त्याचं दु:ख आहेच, पण काळ सोकावतोय. अशाप्रकारची हिम्मत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत, न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली, त्याला कठोर शिक्षा होईल असं वाटतंय, असं राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!