Share

अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधील घरावर अज्ञातांकडून दगडफेक

Published On: 

नांदेड – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधील घरावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. एका अनोळखी महिलने ही दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. चव्हाण यांच्या घराजवळ पोलिस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञात महिलेने दगडफेक केली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. दगडफेक करणारी महिला कोण होती याची माहिती मिळू शकलेली नाहीये, मात्र ही महिला मनोरुग्ण असल्याचं बोललं जात आहे.

या महिलेने केलेल्या दगडफेकीत अशोक चव्हाण यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या केबिनची काच फुटली आहे. या दगडफेकीत कुणालाही दुखापत झालेली नाहीये. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सिसीटीव्ही तपासून दगडफेक करणाऱ्या महिलेचा पोलिस शोध घेत आहेत. चव्हाण यांच्या घरावर या महिलेने कोणत्या कारणाने दगडफेक केली याचाही शोध पोलिस घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!