Share

शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी जागवल्या वनमंत्री असतांनाच्या सुखद आठवणी..!

Published On: 

औरंगाबाद: रत्नपुर तालुक्यातील खांडीपिंपळगाव येथे श्री क्षेत्र भेंडाळा मारुती संस्थान विविध कामांना वनविभागाची परवानगी लागते. तसेच रस्ते व मूलभूत सोई सुविधाच्या विकासकामांना लागणाऱ्या परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) यांच्या माध्यमातून संस्थान पदाधिकारी व वनविभागाची समन्वय बैठक पार पडली. यावेळी खैरे यांनी आपण वनमंत्री असतांनाच्या आठवणींना उजाळा दिला.

या बैठकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी राज्यांचे वनमंत्री असतांना विविध त्रुटी दूर करून अनेक तीर्थक्षेत्र व जुन्या मंदिरांना परवानगी दिल्या आहेत. स्थानिक प्रशासन व वनविभाग यांचा समन्वय असल्यास या परवानगी मिळतात. त्यामुळे विकास सध्या भेंडाळा मारुती तीर्थक्षेत्र येथे जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय आणि लोकप्रतिनिधी यांच्या निधीतून अनेक कामे मार्गी लागली आहेत.

त्यामुळे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता येणाऱ्या काळात सुविधांची वानवा होऊ नये, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. या बैठकीला भेंडाळा मारुती संस्थान अध्यक्ष महेश उबाळे, मुख्य वन संरक्षक गुजर, डीएफओ मनक्वार, रत्नपुर रेंजर पेहरकर, वनपाल मातेरे, तालुकाप्रमुख राजू वरकड, माजी सभापती किशोर कुकलारे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!