Share

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंची भेट; दिले ‘हे’ आश्वासन..!

Published On: 

औरंगाबाद:आठवडाभरापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या आंदोलन स्थळास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) यांनी भेट दिली. यावेळी कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न करु, असे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले. यादरम्यान सहसंचालक रणजितसिंह निंबाळकर(Ranjit Nimbalkar) यांनीही भेट दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षकेत्तर कर्मचारी सेवक संघाने विद्यापीठातील ७९६ पदांना सातवा वेतन आयोग लागू करणे, आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय पूर्ववत चालू करणे, सन २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आदी मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यापीठाचे कामकाज ठप्प झालेले आहे. गेल्या सात दिवसांपासून कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या बंदमुळे महाविद्यालयाचे अंतर्गत मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. या मागण्यांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. उच्च व तंत्रशिक्षकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेना उपशहरप्रमुख हिरा सलामपुरे, भाविसे विद्यापीठप्रमुख डॉ. तुकाराम सराफ तसेच विद्यापीठ कर्मचारी सेवक संघाचे अध्यक्ष पर्वत कसुरे, कर्मचारी नेते डॉ. कैलास पाथ्रीकर आदींची उपस्थिती होती. या आंदोलनात संजय राजपूत, प्रकाश आकडे, एस. बी. चव्हाण, संजय कवडे, रवींद्र काळे आदी कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!