रत्नागिरी : भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत. नाशिकमध्ये अज्ञात कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली. यामध्ये कार्यालयाच्या दोन काचा फुटल्या. तर सांगली शहरातही शिवसैनिक राणेंच्या विरोधात आक्रमक बनले आहेत. संतप्त शिवसैनिकांनी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर असलेल्या पोस्टरवरील नारायण राणे यांच्या प्रतिमेला काळे फासले. तर, नाशिकमध्ये युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली.
तसेच नारायण राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू येथील बंगल्यावर युवासेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. जुहू इथल्या नारायण राणे यांच्या घराबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आलेल्या मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. घरासमोर येऊन आंदोलन केल्याने भाजप नेते तथा नारायण राणे यांचे चिरंजीव यांनी शिवसैनिकांवर टीका केली आहे.
संगमेश्वर येथे बोलताना नितेश राणे म्हणाले की, केवळ चार शिवसैनिक घरासमोर आले. आम्ही घरात नसताना आमच्या घरात येणारी ही लोकं आहेत. शिवसेना ही आता नपुंसकाची टोळी झाली आहे असा टोला त्यांनी लगावला. ‘एबीपी माझा’शी बोलताना नितेश राणे यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली.
तर दुसरीकडे नारायण राणे समर्थक आणि युवा सैनिकांनीमध्ये हाणामारी झाली. यात चार शिवसैनिक जखमी झालेत. या शिवसैनिकांनी आरोप केलाय की पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केला. त्यात आम्ही जखमी झालो. या जखमींची विचारपूस करण्यासाठी युवा सेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई आले होते. राणेंच्या बंगल्याचं संरक्षण करण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे गुंड राणे समर्थक भाजपचे कार्यकर्ते म्हणून आले होते. या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी युवा सेनेने केली आहे. राणेंच्या बंगल्यात गेटच्या आत लपलेले जे गुंड आहेत. त्याचं सीसीटीव्ही व्हिडिओ पोलिसांचा तपास करावा मागणी वरूण सरदेसाई यांनी केली आहे
महत्त्वाच्या बातम्या
- युवासेनेच्या कार्यकर्त्यांवर हात उचलणाऱ्या पोलिसांचे निलंबन करा; सरदेसाईंची मागणी
- नारायण राणेंच्या घराबाहेर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पोलिसांचा लाठीचार्ज; पाहा हा व्हिडिओ
- ‘नारायण राणे छक्का है, नारायण राणे भडवा है!’, संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी
- ‘माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन’, नारायण राणेंची वृत्तवाहिन्यांना धमकी
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंकडून राष्ट्रदोह घडला, त्यावेळी का शांत होतात?’ राणे पत्रकारांवर घसरले


