मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला दणका दिला. शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याने, पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आलेत. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ होते. शिंदे शिवसेनेच्या १३ आमदारांसह गुजरात मध्ये आहेत. एकनाथ शिंदेच्या नाराजीमुळे शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडणार का, अशी चर्चा सुरू आहे. यानंतर प्रस्ताव आल्यास सरकार स्थापन करु असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “आम्ही राजकीय पक्ष आहोत भजनमंडळी नाही. आमचं काम राजकारणाच्या माध्यमातून सत्तेवर येणे, लोकांची सेवा करणे आहे. सत्तेसाठी प्रस्ताव आल्यावर कोण नाही बोलणार. संजय राऊतांच्या महान नेतेगिरीमुळेच शिवसेना अडचणीत आली आहे. त्यावर ते सामनामध्ये अग्रलेख लिहीतील की तुम्हाला आमची चिंता करण्याची गरज नाही. पण एकत्र काम केल्याने आम्हाला शिवसेनेबद्दल प्रेम आहे. त्यामुळे आमचे म्हणणे आहे की संजय राऊत शिवसेनेचे भयंकर नुकसान करत आहेत. ते काम त्यांना कोणी तरी दिले आहे.”
उद्धव ठाकरेंनी दिला होता हा आदेश –
माध्यमांशी बोलू नका, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच १३ आमदार असल्याची माहिती होती. मात्र आता आमदारांसोबतच ठाकरे सरकारमधील ३ मंत्री देखील नॅाट रिचेबल आहेत.
महत्वाच्या बातम्या –


