Share

Milind Narvekar met Eknath Shinde : मिलिंद नार्वेकरांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट

Published On: 

सुरत : शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसनेमध्ये हालचालींना सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकनाथ शिंदे चर्चेसाठी तयार झाले आहेत. या संदर्भात शिवसेनेचे दोन नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाली आहे. यावेळी सुरुवातीला त्यांना हॉटेलच्या आता बराच वेळ सोडण्यात आले नव्हते. मात्र आता गेल्यानंतर लगेच हॉटेलमधून दोन मिनिटांत नार्वेकर बाहेर पडले.

एकनाथ शिंदे जवळपास 30 पेक्षा जास्त आमदार घेऊन सुरतमधील मेरेडीयन हॉटेलमध्ये आहेत. विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे रात्रीच सुरतला रवाना झाले होते. त्यांच्या या बंडाळी नंतर त्यांना गटनेते पदावरून हटवण्यात आले आहे. यामुळे त्यांची नाराजी वाढली असल्याचं समजतय. उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन एकनाथ शिदेंच्या भेटीला निघालेले मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना एकनाथ शिंदेंची नाराजी काढण्यात यश मिळेल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांची या सर्व घडामोडींवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्री पद घेण्यापेक्षा मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो. त्यांनी शिवसेनेत परत येऊन मुख्यमंत्री बनावं, अशी ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली असल्याचं वृत्त न्युज 18 लोकमतने दिल आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!