मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग घिरटू लागले आहेत. ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे हे गुजरातमधील सुरत येथील मेरिडियन हॉटेलमध्ये 21 आमदारांसोबत तळ ठोकून बसले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारवर धोक्याची घंटा वाजली आहे. यावर अभिजीत बिचुकले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“माझा आणि शिवसेनेचा तसा संबंध नाही. मी अपक्ष आहे. आता जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कानाखाली जाळ काढला असता. हे जे सगळे आहेत ते बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर मोठे झाले आहेत.अभिजीत बिचुकले जेव्हा वरळीमध्ये येऊन उभा राहतो. तो माझा अभिमान आहे. माझी कॉपी करायची या लोकांना सवय लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर बोदरेशनचं राजकारण चालु आहे”, असे अभिजीत बिचुकले म्हणाले.
संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपवर निशाणा साधत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे उद्धव ठाकरे सरकार पाडण्याचा हा डाव आहे. शिवसेना हा निष्ठावंतांचा पक्ष आहे, आम्ही असे होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.
राऊत म्हणाले की, “सुरतमध्ये राहणाऱ्या काही आमदारांशी बोललो आहे. त्यांपैकी काहींना परत यायचे आहे, परंतु त्यांना परवानगी दिली जात नाही. सर्व आमदार ‘निष्ठावान शिवसैनिक’ असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मात्र आमदारांवर दबाव निर्माण केल्या जात आहे. आमदार नितीन देशमुख यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यांनी फोन करुन सांगितले. त्यांना महाराष्ट्रात यायचे होते. शिवसेनेच्या दोन आमदारांना मारहाण करण्यात आली आहे.”
काल महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये महाविकास आघाडी सरकारला जोरदार झटका बसला होता. विधानपरिषद निवडणुकीत सहापैकी आघाडीचे केवळ पाच उमेदवार निवडून आले असून, भाजपचे तेच पाच उमेदवार विजयी झाले आहेत. महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते. दहाव्या जागेवर काँग्रेसच्या दोन उमेदवारांमध्ये संघर्ष झाला, त्यात भाई जगताप विजयी तर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

