Share

Shivsena । खातेवाटपानंतर चंद्रकांत पाटील आणि मुनगंटीवार यांची अवस्था केविलवाणी झालीय; शिवसेनेची खोचक टीका

Published On: 

Shivsena । मुंबई : अखेर सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास ४० दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र मंत्रिमंडळ विस्तारावरून असं लक्षात येतंय कि सर्व प्रमुख खाती भाजपाकडे गेली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार हि सर्व महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली आहेत. यावरून आता शिवसेना मुखपत्र सामानाच्या अग्रलेखातून शिंदे गटावर सडकून टीका करण्यात येत आहे. आज पुन्हा एकदा सामनातून हल्लाबोल करण्यात येत आहे.

नेमकं काय म्हंटल आहे अग्रलेखात ?

नगरविकास हे खाते मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात. पण उद्धव ठाकरे यांनी ते शिंदे यांना विश्वासाने बहाल केले होते. साधारणतः मुख्यमंत्र्यांकडे सार्वजनिक प्रशासन, विधी व न्याय अशी खाती असतात. न्याय व्यवस्था भाजपने आपल्या मुठीत ठेवली. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार हे खातेवाटपाच्या धक्क्यातून सावरले आहेत काय, ते विधानसभेत दिसेल. या दोघांची अवस्था केविलवाणी झाली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात अनेक चेहरे उघडे पडतील व मुखवटे गळून पडतील. चेहऱ्यांवर खोटे हसू आणून या दुःखी लोकांना समोर यावे लागेल.

विधानसभेत अजितदादा पवार व विधान परिषदेत अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते पदावर विराजमान झाले आहेत व ते या गटातटाच्या सरकारची काsंबडी सोलून काढतील. पन्नास दिवसांनंतरही सरकार कामाला लागलेले नाही. शिंदे गट तर खातेवाटपाच्या चक्रव्यूहात अडकून पडला. एक-दोन मंत्र्यांना अबकारी, उद्योग अशी खाती मिळाली. बाकीचे कोरडेच आहेत. अब्दुल सत्तार हे राज्याचे कृषीमंत्री झाले. केसरकर शिक्षणमंत्री झाले. आता केसरकर राणेंच्या शाळेत जाणार की राणे केसरकरांची शिकवणी लावणार? पण स्वतःला राजहंस समजणाऱ्यांचा भाजपने साफ बगळा करून टाकला व त्या बगळ्यांची फडफड सुरू झाली आहे.

शिंदे गटाचे काही उठवळ आमदार हे राज्य म्हणजे बापाचे राज्य असल्यासारखे वागू-बोलू लागले. शिवसैनिकांचे हात तोडता आले नाहीत तर तंगडय़ा तोडू, अशी भाषा प्रकाश सुर्वे या आमदाराने केली. शिंदे गट व त्यांचे लोक म्हणजे सरपटणारे प्राणी आहेत काय? त्यांना अवयव, इंद्रिय नाहीत काय? हिंगोलीत संतोष बांगर या ढोंग्याने सरकारी अधिकारी आणि पुरवठादाराला उघड मारहाण केली. यालाच कायद्याचे राज्य म्हणायचे काय? विधानसभेत या झुंडशाहीवर आवाज उठवायलाच हवा. भारतीय जनता पक्षाला व त्यांच्या दिल्लीश्वरांना जे हवे तसेच घडते आहे.

मराठी माणसाला मराठी माणसांविरुद्ध, शिवसैनिकाला शिवसैनिकांविरुद्ध लढायला लावून हे बादशहा व त्यांचे वतनदार मजा पाहत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात ठाण्याचे खासदार राजन विचारे व असंख्य शिवसैनिकांना झेंडावंदन करण्यासाठी पोलिसांनी रोखले. तुम्ही शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे, असे प्रश्न विचारीत शिवसैनिकांना नोटिसा दिल्या. ठाण्याच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिंदे गटाचे मुख्यमंत्री येणार म्हणून पोलीस छावणीचेच रूप आणले. शिंदे गटास आत्मविश्वास नसल्यामुळेच हा भेदरटपणा व दडपशाही सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!