Share

Abdul Sattar | भाजपने ८० टक्के खाते स्वत:कडे ठेवली? अब्दुल सत्तार म्हणाले…

Published On: 

जालना : कालच राज्यातील मंत्र्यांचे खाते वाटप पार पडले. या खाते वाटपात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व महत्वाची खाती भाजपकडे ठेवून शिंदे गटाला तुलनेने कमी दर्जाची खाती दिली असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरच बोलताना आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. “कोणतं खातं दिल आहे ते महत्वाचं नाही. जी खाती दिली आहेत त्याचं सर्व काम आम्ही शिवसेना आणि भाजप मिळून समन्वयाने करू. या विरोधी पक्षाच्या डोळ्यावर जो चष्मा लागलेला आहे त्याच पद्धतीने ते पाहत राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी जी खाती मंत्र्यांना दिली आहेत, त्याची जबाबदारी कशी पार पाडावी हे त्यांनी सांगितलं पाहिजे.”, असे सत्तार म्हणाले.

तसेच पुढे ते म्हणाले कि, “मुख्यमंत्री शिंदे हे रोज १८ तास काम करतात. तर फडणवीस हे १५ तास काम करतात. त्यांच्या कामाचं मूल्यमापन विरोधकांनी केलं पाहिजे. फक्त विरोधाला विरोध करू नये. त्यामुळे आता ज्या जबाबदाऱ्या मंत्र्यांवर आल्या आहेत. त्यांनाही त्याच प्रकारे काम करावं लागेल. ते प्रत्येक ३ महिन्यांनी प्रत्येक खात्याच्या कामाचा आढावा घेणार आहेत. त्यामुळेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली सर्व १८ मंत्री चोख काम करतील.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!