🕒 1 min read
मुंबई : भारतीय राज्य घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा घोटू नका, असा इशारा देत कुणी काय खावे, काय घालावे आणि आता काय बोलावे, हे तुम्ही ठरवणार का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारला आहे. मुनगंटीवार यांनी शासकीय कार्यालयात बोलताना हॅलो ऐवजी वंदे मातरम बोलावे असे म्हटले असून तसा आदेशच त्यांनी काढला आहे. जर आम्ही तसे म्हटले नाहीतर तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन मुनगंटीवार यांच्यावर टिका केली. भारतीय संस्कृतीमध्ये नमस्कार केला जातो आणि यातूनच संस्कृतीची सुरूवात होते. कोणी जय भीम बोलतो तर कोणी जय हिंद म्हणतो. त्यातून भावना व्यक्त होतात, त्या महत्वाच्या आहेत. पण, लोकांनी बोलायची सुरुवात कशाने करायची, हे तुम्हीच ठरविणार किंवा सांगणार का, मग तुम्हाला सुधीरजी मुनगंटीवार म्हणायचे की सुधीर मुनगंटीवारजी असे म्हणायचे किंवा भाऊ म्हणायचे हे सुद्धा तुम्ही जाहीर करून टाका, अशी टिकाही त्यांनी केली. अशीं टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Deepak Kesarkar | “शिवसेनेने वाटाघाटी करून जोर केला असता तर…” ; दीपक केसरकरांची खातेवाटपावर प्रतिक्रिया
- Supriya Sule | सुप्रिया सुळे यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार! वाचा, नक्की काय आहे प्रकरण?
- Sameer Wankhede । क्लीन चिट मिळाल्यानंतर समीर वानखेडे आक्रमक, नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ
- Abdul Sattar | शेतकरी आत्महत्या ही सर्वात दुर्दैवी बाब – अब्दुल सत्तार
- Santosh Bangar । पहा संतोष बांगर यांची ‘दबंग’ स्टाईल; हॉटेल मॅनेजरच्या कानशिलात लगावल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
