मुंबई : चर्चित येस बँक आर्थिक संकटात सापडल्यानंतर ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्यावर करवाई करण्यात आली होती. त्यावेळी राणा यांच्या घरातून कागदपत्र आणि महत्त्वाचे रेकॉर्ड्स जप्त करण्यात आले होते. तसेच ईडीनं मनी लाँड्रिंग कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला होता.
खाजगी क्षेत्रातील एक मोठी बँक असलेल्या येस बँकेची स्थिती हळू हळू सुधारत आहे. तर आता गॅस बंद करून वेगवेगळ्या मार्गाने फंड जमा करण्याच काम सुरू झालं आहे. या पार्श्वभूमीवर बँकेची बोर्ड मीटिंग पार पडणार असून यावेळी बँकेच्या तिमाही धोरण जाहीर करण्यात येईल.
या मीटिंगच्या बातमीनंतर सोमवारी येस बँकेच्या शेअरची किंमत वाढल्याचे दिसून आले. यावेळी बँकेच्या शेअर मध्ये ०.२८% ची वाढ झाली तर १७.६५ वर थांबले. त्याचबरोबर डिसेंबर तिमाहीमध्ये बँकेच्या कर्जामध्ये १.३% वाढ झाली असून १.६९ लाख कोटी झाले. या आधी सप्टेंबर तिमाहीमध्ये बँकेचं कर्ज १.६६ लाख कोटी रुपये होत. बँकेकडून सांगण्यात आलं की, या मीटिंग मध्ये डिपॉझिटरी रेसिप्टस, कन्वर्तीबल बॉण्ड, वॉरंट, किंवा दुसऱ्या ईक्विटी लिंक सिक्युरिटीज माध्यमातून निर्णय घेण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- रिपब्लिक चॅनेलचे सदयत्व रद्द करा, NBA ची IBF कडे मागणी
- असमानतेचा सामना करून अखेर तृतीयपंथी अंजली पाटील यांनी संघर्षाचा शेवट गोड केला !
- विमानतळाचे नाव होणार छत्रपती संभाजीराजे विमानतळ-अतुल सावे
- ग्रामसभा पूर्ववत सुरु करण्यास संमती; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा महत्वपूर्ण निर्णय
- ‘गद्दारी करून ठाकरे सरकार मध्ये बसलेत,त्यांना अपेक्षित यश कधीच मिळणार नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

