🕒 1 min read
औरंगाबाद : राज्यात सगळीकडे ग्रामपंचायतीचा निकालांमध्ये अनेक दिग्गजांना फटका बसलाय. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटलांसह अनेकांना धक्के बसते. पाटोदा गावाचं नाव आदर्श ग्रामपंचायत आणि आदर्श सरपंच म्हणून देशभरात पोहचले, त्यांच्याच पॅनेलला मतदारांनी नाकारल्याचे चित्र आहे. माझ्या मुलीचा पराभव माझ्यासाठी धक्कादायक निकाल नसल्याचे पेरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या देशाने इंदिरा गांधीसारख्या नेत्यांचाही पराभव पाहिलाय, अशा शब्दात भास्कर पेरे पाटील यांनी मुलीच्या पराभवाबाबत मत व्यक्त केले.
ते म्हणाले, माझ्या मुलीकडे एक मुलगी म्हणून पाहू नका. कारण, गावातून निवडूण आलेले सर्वजणच आपलेच आहेत. मी गेल्या 8 दिवसांपासून गावाबाहेर आहे, मी कर्नाटकात होतो. माझी सख्खी मुलगी असली तरी, अख्ख गाव माझे आहे, अशा शब्दात भास्कर पेरे पाटील यांनी आपल्या मुलीच्या पराभवाच्या समिक्षा केलीय. मुलीची इच्छा होती, म्हणून तिने निवडणूक लढवली. त्यात 10-12 मतांनी तिचा पराभव झाला, त्यात विशेष काही नाही. यातून खूप काही शिकायला मिळतं. माझाही एकदा पराभव झाला होता, इंदिरा गांधींसारखे नेते निवडणुकीत पडलेत, त्यात काही विशेष नाही. कारण, आपल्या देशात लोकशाही आहे.
गावातील लोकं सुशिक्षित अन् समजदार आहेत. गावाला पुढे घेऊन जाणारे सर्व लोकं आहेत. त्यामुळे, गावचा विकास थांबणार नाही, गावच्या राजकारणात अनेक हेवेदावे असतात. पण, निवडून आलेल्या उमेदवार मुलीच्या गळ्यात माझ्या मुलीने हार घातला, यावरुन आपण सर्व लक्षात घेतला पाहिजे, असे पेरे पाटील यांनी सांगितलं. आता, मी मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे. त्यासाठी, मी स्वत: वेगळे कार्यालय सुरू केलं आहे, असेही पाटील यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या
- रिपब्लिक चॅनेलचे सदयत्व रद्द करा, NBA ची IBF कडे मागणी
- असमानतेचा सामना करून अखेर तृतीयपंथी अंजली पाटील यांनी संघर्षाचा शेवट गोड केला !
- विमानतळाचे नाव होणार छत्रपती संभाजीराजे विमानतळ-अतुल सावे
- ग्रामसभा पूर्ववत सुरु करण्यास संमती; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा महत्वपूर्ण निर्णय
- ‘गद्दारी करून ठाकरे सरकार मध्ये बसलेत,त्यांना अपेक्षित यश कधीच मिळणार नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
