Share

शिवसेना-भाजप कार्यकर्ते पुन्हा समोरा-समोर; शिवसेना भवनाची पुनरावृत्ती टळली

Published On: 

सिंधुदुर्ग : शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली वादावादी ताजी असतानाच कोकणात पुन्हा त्याची पुनरावृत्ती टळली आहे. सिंधुदुर्गात पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने हा वाद टळला. आमदार वैभव नाईक यांनी भाजपला डिचवण्यासाठी शिवसेना वर्धापण दिनी विशेष योजना जाहीर केली होती. यात भाजप सदस्य असल्याचे कार्ड दाखवणाऱ्याला १ लीटर पेट्रोल मोफत देण्याची त्याची योजना होती. मात्र, त्याच वेळी भाजप कार्यकर्ते तेथे पोहोचल्याने तणाव निर्माण झाला होता.

आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त १०० रुपयात २ लिटर पेट्रोलची योजना आखली होती. त्यात भाजप सदस्य असल्याचे कार्ड दाखवले तर एक लिटर पेट्रोल मोफत देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती. विशेष म्हणजे ही योजना राबवण्यासाठी त्यांनी भाजप नेते नारायण राणे यांचा पेट्रोल पंप निवडला. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वाद झाला.

दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्या नंतर कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. यात आमदार वैभव नाईक यांचाही समावेश होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केली, त्यामुळे वाद मिटला. नंतर वैभव नाईक कार्यकर्त्यांसह दुसऱ्या पेट्रोल पंपावर निघून गेले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!