बीड : मागील काही दिवसांपासून राणा दाम्पत्य आणि शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असे आव्हान नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याने दिला होता. यामुळे राणा दाम्पत्याला अटक होऊन त्यांच्यावर १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर या दाम्पत्याला आता जामीनही मिळाला आहे. पण अजूनही राणा दापत्य आणि शिवसेना यांच्यातलं संघर्ष संपण्याचे नाव घेत नाही. आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माझी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नवनीत राणा यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
चंद्रकांत खैरे यांनी खासदार नवनीत राणा यांच्या वर आपल्या वेगळ्याच शैलीत टीका केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले, “नवनीत राणाबद्दल मी काहीही बोलणार नाही, मला त्या बाईचा राग आलेला आहे. उद्धव साहेब यांच्याबद्दल “ती” बाई काहीही बोलते आहे. आम्ही शिवसैनिक आमच्या डोक्यात वेगळी अक्कल असते आणि गुडघ्यामध्ये आमची अक्कल असते.” अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी राणा यांना इशारा दिला. बीड मध्ये आज खैरे यांनी माध्यमांशी संवाद साधत होते.
यानंतर आता राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यातलं संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. चंद्रकांत खैरे यांच्या या वक्तव्यावर राणा दाम्पत्याची अजूनही कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. भाजपकडून ही अद्याप यावर प्रत्युत्तर आलेले नाही. परंतु आता पुन्हा एकदा संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


