आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ५४वा सामना बंगळूरू विरुद्ध हैदराबाद (RCB vs SRH) यांच्यात खेळवला जात आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळूरू संघ रविवारी हैदराबादविरुद्ध हिरव्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानात उतरला आहे. परंतु या रंगाच्या जर्सीत आरसीबी (RCB)चा विक्रमही काही खास नाही. हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये संघाची जिंकण्याची टक्केवारी फक्त २० टक्के आहे.
हिरव्या जर्सीमध्ये RCBचा रेकॉर्ड
आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये दुहेरी हेडरचा पहिला सामना रविवारी सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB) यांच्यात खेळला जाईल. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दुपारी साडेतीन वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्यात आरसीबी संघाचे खेळाडू हिरव्या रंगाच्या जर्सीत दिसणार आहेत. गो ग्रीन उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी संघ ही जर्सी परिधान करून सामना खेळणार आहेत. मागील काही हंगामात खेळल्या गेलेल्या सामन्यांत या जर्सीत आरसीबी (RCB) संघाची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही.
आयपीएलच्या इतिहासात आरसीबी संघ १० वेळा हिरव्या रंगाच्या जर्सीत उतरला आहे. यामध्ये संघाने २ सामने जिंकले असून ७ सामने गमावलेले आहेत. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे. गेल्या चार वर्षात आरसीबी संघाने हिरव्या जर्सीत एकही सामना जिंकलेला नाही. आयपीएल २०११ मध्ये आरसीबी पहिल्यांदा हिरव्या जर्सीमध्ये मैदानात उतरला होता. २०११ ते २०२० पर्यंत आरसीबीने प्रत्येक हंगामात हिरव्या जर्सीमध्ये एक सामना खेळला, तर २०२१ मध्ये संघाने निळी जर्सी परिधान केली होती.
And the tradition continues…????????????
Drop a ???? if you’re excited for our #GoGreen Game today, 12th Man Army! #PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #ForPlanetEarth #SRHvRCB pic.twitter.com/sn08Jwznk6
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 8, 2022
आरसीबीने सर्वांना आवाहन केले
पृथ्वी स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासोबतच लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्व खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी हिरव्या जर्सीमध्ये दिसणार आहेत. सर्वांनी ‘गो ग्रीन’ उपक्रमाला पाठिंबा देण्याचे आवाहन संघाकडून करण्यात आले. निसर्ग रक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती चा भाग म्हणून आरसीबी हिरवी जर्सी परिधान करणार आहे. आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये संघाने कोरोना वॉरियर्सना श्रद्धांजली वाहण्यासाठी निळ्या रंगाची जर्सी परिधान केली होती.
RCB चा नेट रन रेट
आयपीएल २०२२ (IPL 2021) मध्ये बंगळुरूची कामगिरी चांगली राहिली आहे. संघाने आतापर्यंत ११ सामने खेळले असून ६ सामने जिंकले आहेत. १२ गुणांसह आरसीबी संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. संघाचा नेट रन रेट -०.४४४ चिंतेचा विषय आहे. आरसीबीला आणखी तीन सामने खेळायचे आहेत. त्यामध्ये आरसीबीचा सामना ८ मे रोजी हैदराबाद, १३ मे रोजी पंजाब किंग्ज आणि १९ मे रोजी गुजरात टायटन्सशी होणार आहे. आरसीबीला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी उर्वरित तीन सामने जिंकणे गरजेचे आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

