🕒 1 min read
जालना: राज्यात सध्या बाबरी कोणी पाडली याच्या श्रेयवादावरून भाजप-शिवसेनेत वाद सुरु असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेने बाबरी पाडताना फक्त शिवसेना पुढे असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी पडताना तेथे एकही शिवसैनिक उपस्थित नसल्याचे म्हटले आहे. यावरच आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी प्रतिक्रिया शिवसेनेला टोला लगावला आहे.
“बाबरी पाडताना मी स्वतः त्या ठिकाणी अयोध्येमध्ये होतो. दुर्बिणीने शोधून सुद्धा कुणी शिवसैनिक आम्हाला तिथे दिसला नाही. एखादा शिवसैनिक होता, तर त्याचा पुरावा त्यांनी दाखवावा. मी, गोपीनाथराव मुंडे आणि त्या काळातील अनेक भाजप नेते त्याठिकाणी होते. आता आम्ही केलेले श्रेय जर ते लाटत असतील, देशाची जनता त्यांना माफ करणार नाही.”, असेही रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.
दरम्यान फडणवीस यांच्या दाव्याला मंत्री आदित्य ठाकरे यांनी खोचक प्रत्युत्तर दिले आहे. १८५७ च्या लढ्यातही फडणवीस यांचं खूप मोठं योगदान आहे. पण या गोष्टीत जाण्यापेक्षा, या वादात जाण्यापेक्षा राम मंदिर बाबत कोर्टाने निकाल चांगला दिला आहे. आता महाराष्ट्रासमोर बेरोजगारीचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यावर राजकीय पक्षांनी बोललं पाहिजे. चर्चा केली पाहिजे. असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बाबरी वरून भाजप-सेना आमने-सामने आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…हेच का तुमचे न सोडलेले ज्वलंत हिंदुत्व..?”, संजय राऊतांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांची टीका
- इतकी असहायता का?; ‘त्या’ हल्ल्याप्रकरणी मोहित कंबोज यांचा आयुक्त संजय पांडे यांना सवाल
- “आली रे आली महाचोरांच्या आघाडीला केराची टोपली…”, सदाभाऊ खोत यांचे टीकास्त्र
- “MNS नंतर शिवसेना सभा घेणार असेल तर AIMIM…”, इम्तियाज जलील यांचा इशारा
- “…क्षितिजावर पोहचणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही”, मनीषा कायंदेंचा फडणवीसांवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
