🕒 1 min read
मुंबई : राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज संस्थांच्या (Local Body Election) निवडणुकांचा कार्यक्रम २ आठवड्यात जाहीर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या मुद्द्यावरून रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘महानगरपालिका व जि.प. निवडणूकीच्या तारखा दोन आठवड्यात जाहीर करा, असे सुप्रिम कोर्टाने म्हंटले आहे. आली रे आली महाचोरांच्या आघाडीला केराची टोपली दाखवण्याची वेळ आली’, असे म्हणत खोत यांनी मविआ सरकारवर टीका केली आहे.
महानगरपालिका व जि.प. निवडणूकीच्या तारखा दोन आठवड्यात जाहीर करा – सुप्रिम कोर्ट
आली रे आली महाचोरांच्या आघाडीला केराची टोपली दाखवण्याची वेळ आली.
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) May 5, 2022
दरम्यान, ओबीसी आरक्षणावरील (OBC Political Reservation Case) अंतिम सुनावणीत हे आदेश देण्यात आले असून सुप्रीम कोर्टात विकास गवळी यांनी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर हे आदेश देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा अपमान शोधणाऱ्या शिवसेनेच्या…”, मनसुख हिरेन प्रकरणावरून केशव उपाध्ये यांची टीका
- “…क्षितिजावर पोहचणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही”, मनीषा कायंदेंचा फडणवीसांवर निशाणा
- “जे लोक देशात हिजाबपासून भोंग्यापर्यंत…”, संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
- “दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है…”, जितेंद्र आव्हाड यांचा विरोधकांना जोरदार टोला
- “धर्माचा कुणी राजकीय बाजार भरवत असेल तर…”, रोहित पवारांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
