Share

“MNS नंतर शिवसेना सभा घेणार असेल तर AIMIM…”, इम्तियाज जलील यांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेत पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याबाबत मुद्दा मांडला होता. त्यातच आता शिवसेनाही याच मैदानावर शिवसेनेच्या वर्धापन दिनी ८ जूनला सभा घेणार आहे. मात्र आता खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनीही मोठे विधान करत इशारा दिला आहे.

“मनसेनंतर शिवसेना सभा घेणार असेल तर, एमआयएमदेखील मागे राहणार नाही. आम्हीही त्याच मैदानावर खुर्च्या न टाकता मोठ्या संख्येने सभा घेणार. तेव्हा मला कोण थांबवते ते पाहू!”, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

दरम्यान कालच सुप्रीम कोर्टाने महापालिका निवडणूक प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश दिल्याने या सभा त्यादृष्टीने महत्वाच्या ठरू शकतात. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा त्यातच एमआयएमने दिलेला इशारा याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!