Share

“…हेच का तुमचे न सोडलेले ज्वलंत हिंदुत्व?”, संजय राऊतांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा काही जणांचा डाव असून मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप हे करीत आहे. महाराष्ट्रातील काकड आरत्या यानिमित्ताने बंद झाल्या. हे हिंदूंचे नुकसान आहे. मनसेचा हिंदू-हिंदू मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. मात्र, हिंदूंनी आता संयम राखावा, असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. दरम्यान, राऊतांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,‘हिंदूंना संयमाचे धडे देणारे हेच का ते तुमचे न सोडलेले ज्वलंत हिंदुत्व..?’, असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

दरम्यान, ‘भाजपला जी गोष्ट करणे शक्य होत नाही. ती गोष्ट ते छोट्या पक्षांच्या माध्यमातून करतात. छोट्या पक्षांचा भाजप सातत्याने बळी देते. तसेच आता हिंदूंमध्ये फूट पाडून भाजपने राज ठाकरे यांचाही बळी दिला आहे’, असेही संजय राऊत काल (४ मे) प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!