मुंबई: भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी २२ एप्रिल हल्ला केला होता. मोहित कंबोज उत्तर भारतीय भवन येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता तेथून परतताना हा हल्ला झाला होता. ते कलानगर येथील सिग्नलवर थांबले असता मातोश्री बाहेर असलेल्या शिवसैनिकांनी कंबोज यांच्या गाडीवर शिवीगाळ करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याप्रकरणी अजून कोणताही पाठपुरावा करण्यात न आल्याने मोहित कंबोज यांनी आयुक्त संजय पांडे ( Sanjay Pandey) यांना सवाल केला आहे.
“२२ एप्रिलला माझ्यावर हल्ला झाला, २४ एप्रिलला सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. मात्र अद्याप कोणतीही कारवाई नाही, अद्याप अटक नाही. सीपी संजय पांडे यांना माझा प्रश्न आहे की, समाजात तुमची कोणती छाप निर्माण होत आहे?, हे लोकशाहीसाठी चांगले आहे का?, इतकी असहायता का?”, असे सवाल मोहित कंबोज यांनी ट्वीट करत केले आहे.
22 / April Attack Was Done On Me ,
24 / April FIR Was Registered At Santacruz Police Station !No Action Yet ,No Arrest Yet !
My Question To CP Sanjay Panday:
1: What Impression You Are Creating In Society ?
2: Is This Good For Democracy ?
3: Why So helplessness ?@sanjayp_1— Mohit Kamboj Bharatiya (@mohitkamboj_) May 5, 2022
दरम्यान मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करताच पोलिसांनी त्या दिशेने धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते. मात्र भाजपकडून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत ठाकरे सरकारवर प्रचंड टीका करण्यात आली. आता मोहित कंबोज यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा हा मुद्दा समोर आणला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “आली रे आली महाचोरांच्या आघाडीला केराची टोपली…”, सदाभाऊ खोत यांचे टीकास्त्र
- “MNS नंतर शिवसेना सभा घेणार असेल तर AIMIM…”, इम्तियाज जलील यांचा इशारा
- “…क्षितिजावर पोहचणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही”, मनीषा कायंदेंचा फडणवीसांवर निशाणा
- “प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा अपमान शोधणाऱ्या शिवसेनेच्या…”, मनसुख हिरेन प्रकरणावरून केशव उपाध्ये यांची टीका
- “धर्माचा कुणी राजकीय बाजार भरवत असेल तर…”, रोहित पवारांचा इशारा


