🕒 1 min read
मुंबई: बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा तिथे एकही शिवसैनिक नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर 1857 च्या उठावात पण देवेंद्र फडणवीसांचं योगदान असेल असा टोला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी ‘सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले जे मर्सिडीज बेबी आहेत’, अशी टीका केली आहे. आता थेट शिवसेना नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande ) यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे.
“राजकीय वारसा लाभूनही स्वबळावर राजकीय क्षितिजावर पोहचणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही. मामू हे तर तुम्हीही मान्य कराल. टिकेसाठी टीका नको. आदित्यजी यांच्या कामाचा धडाका बघून आणि ते लंबी रेस का घोडा आहे म्हणून तर तुम्हाला धडकी भरली नाही ना?”, असा खोचक टोला मनीषा कायंदे यांनी ट्वीट करत लगावला आहे.
राजकीय वारसा लाभूनही स्वबळावर राजकीय क्षितिजावर पोहचणे हे येऱ्या गबाळ्याचे काम नाही. #मामू हे तर तुम्हीही मान्य कराल. टिकेसाठी टीका नको. #आदित्य जी यांच्या कामाचा धडाका बघून आणि ते लंबी रेस का घोडा आहे म्हणून तर तुम्हाला धडकी भरली नाही ना?@Dev_Fadnavis @AUThackeray #BJP pic.twitter.com/veM7H6oXUL
— Dr.Manisha Kayande (@KayandeDr) May 5, 2022
काय म्हणाले होते फडणवीस?
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले जे ‘मर्सिडीज बेबी’ आहेत त्यांना काय माहित संघर्ष काय असतो? त्यांनी तो पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते निश्चितच उडवू शकतात. पण आमच्यासारखे हजारो नाही लाखो कारसेवक बाबरी ढाचा पाडला तेव्हा तिथे होते. आम्हाला त्याचा अभिमान आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या:
- “प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा अपमान शोधणाऱ्या शिवसेनेच्या…”, मनसुख हिरेन प्रकरणावरून केशव उपाध्ये यांची टीका
- “धर्माचा कुणी राजकीय बाजार भरवत असेल तर…”, रोहित पवारांचा इशारा
- “दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है…”, जितेंद्र आव्हाड यांचा विरोधकांना जोरदार टोला
- “जे लोक देशात हिजाबपासून भोंग्यापर्यंत…”, संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
- “घालीन लोटांगण, वंदीन चरण…”, राहुल गांधींच्या ‘त्या’ फोटोवरून राम कदम यांचा शिवसेनेवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
