🕒 1 min read
मुंबई : शुक्रवारी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री दर्जा असणारे किशोर तिवारी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मुंबईत आलो होतो, पण मुख्यमंत्री भेटले नाहीत, त्यामुळे राज्यपालांकडे जाऊन भेट घेतली, असा खुलासा त्यांनी केला.
मागील ४ दिवसांपासून किशोर तिवारी मुंबईत आहेत, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्यांना भेट झाली नाही अखेर तिवारी यांना राजभवनाचे दार ठोठावले. राज्यातील प्रश्नांना घेऊन राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशी टीका अलीकडेच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती, राऊतांचा निशाणा भाजपा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर होता, पण आता खुद्द स्वतःच्या पक्षातील नेत्यानेच उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत म्हणून राज्यपालांना भेटावं लागलं अशी घटना समोर आल्यानंतर विरोधकांनी टीकास्त्र सोडलं आहे.
भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. “मुख्यमंत्र्यांना 50 फोन करून सुद्धा फोन उचलत नाही आणि भेटत नाही अशी एका शिवसेना आमदाराची तक्रार. एका शिवसेना आमदाराची अशी परिस्थिती असेल तर सामान्य शिवसैनिकांची अवस्था किती बिकट असेल ह्यावरून लक्षात येतं. फक्त भाषणातून सांगायचं शिवसैनिक माझा श्वास आहे नंतर शिवसैनिक फाट्यावर.” अशी जहरी टीका राणेंनी ठाकरेंवर केली आहे.
मुख्यमंत्र्यांना 50 फोन करून सुद्धा फोन उचलत नाही आणि भेटत नाही अशी एका शिवसेना आमदाराची तक्रार. एका शिवसेना आमदाराची अशी परिस्थिती असेल तर सामान्य शिवसैनिकांची अवस्था किती बिकट असेल ह्यावरून लक्षात येतं. फक्त भाषणातून सांगायचं शिवसैनिक माझा श्वास आहे नंतर शिवसैनिक फाट्यावर.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 7, 2020
महत्वाच्या बातम्या
- ‘एकही ट्रॉफी न जिंकता कोहली आठ वर्ष कर्णधार का?’; आरसीबीच्या पराभवानंतर गंभीर भडकला
- पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या राज्यातील आमदारांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे- सुजय विखे
- ‘तुरूंगातून जामिनावर बाहेर आलेले छगन भुजबळ अलीकडे खूपच विनोदी बोलतात’
- सोशल मीडियावर अश्लीलता पसरवल्यामुळे मिलिंद सोमणच्या अडचणीत आणखी वाढ
- ‘मी निवृत्त झाले’ म्हणून धक्का देणारी पी. व्ही. सिंधू एशियन स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

