🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- एक जुनी म्हण आहे, उंचीवर दगड फेकला की तो स्वतःच्याच अंगावर येतो. अशीच अवस्था सध्या काही आमदारांची झाली आहे. महाविकास आघाडी सरकारने मागील वर्षभरात एकही चांगले काम केले नाही.
या सरकारवर कोणीच समाधानी नाही. केंद्र सरकारच्या कामावर देशातील जनता खुश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जाऊ शकत नाही. जे आमदार टीका करीत असतील, त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. टीका करण्याआधी आपण काय कामे केली, ते लोकांसमोर ठेवावेत, असे आवाहन भाजपचे खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला केले आहे.
खा.विखे पुढे म्हणाले की, हे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी नाही. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे व्यापारी अडचणीत आहेत. जनता तर अनेक प्रश्नांनी होरपळून निघत आहे. असे असताना या सरकारने लोकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करावे.
त्यांनी केंद्रावर टीका करण्यापेक्षा वर्षभरात काही कामे केली असतील तर त्याचेच प्रदर्शन करावे. त्याची प्रसिद्धी करावी. त्यांच्याकडे सांगण्यासारखे एकही काम नाही. एकही काम नसल्याने जनतेला दाखविण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नाही. केंद्रावर टीका करण्याचे कारण नाही. भारतातील जनतेने पंतप्रधान मोदी यांच्यावर मोठा विश्वास ठेवला आहे, असे खासदार विखे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर महाराष्ट्रातील काही आमदार टीका करत असतात. त्यावर डाॅ.विखे पाटील यांनी मतप्रदर्शन करीत संबंधित आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. पंतप्रधानांनी देशपातळीवर राबविलेल्या विविध योजनांमुळे सर्वसामान्यांना मोठा आधार होत आहे. योजनांचा फायदा घेऊन अनेक लहान-मोठे उद्योग उभारले जात आहेत.
असे असताना केवळ राजकीय आकसापोटी पंतप्रधानांवर टीका होत असल्याचे मत खासदार विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. मोदी यांचे व्यक्तीमहत्त्व असे आहे, की त्यांच्यावर टीका होऊ शकत नाही. जे आमदार टीका करतात त्यांनी त्यांचे स्वतःचे काम तपासावे, आत्मपरीक्षण करावे, अशी टीका खा.विखे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मंदिरे कधी उघडणार?; बाळासाहेब थोरातांनी दिली खूषखबर…
- मुख्यमंत्रीपद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिले – खडसे
- ‘अर्नबसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या भाजपच्या रक्तात आणि मेंदूत काहीतरी गडबड’
- नूपुर सॅनॉन करणार टायगर सोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण
- मोठी बातमी : शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याची आमदारकी धोक्यात ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

