युएई : आयपीएलचे विजेतेपद मिळविण्यासाठी आता आव्हान अधिक अवघड होत चाललं आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सच्या सामन्यामध्ये मुंबईने दणदणीत विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. यानंतर, काल झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैद्राबादमध्ये ‘करो या मरो’ सामन्यात बेंगलोरला हार पत्करावी लागली आहे.
बंगलोरच्या या पराभवानंतर त्यांचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर विराट कोहली व संघावर जोरदार मेम्स व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने देखील विराट कोहलीला लक्ष्य केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आता विराट कोहलीच्या पलिकडे जाऊन नवीन कर्णधाराचा पर्याय शोधावा, असं रोखठोक मत त्यानं व्यक्त केलं.
तर, “आठ वर्ष एका टूर्नामेंटमध्ये, आणि एकही ट्रॉफी नाही, आठ वर्ष हा खूप मोठा काळ झाला. मला एक कर्णधार सांगा, कर्णधार सोडा, एखाद्या खेळाडूचे नाव सांगा, ज्याला आठ वर्ष मिळाली, पण विजेतेपद न मिळूनही त्याला कायम ठेवण्यात आले. कर्णधाराने जबाबदारी घ्यायला पाहिजे” असा घणाघात गंभीरने केला आहे.
“आर अश्विनचं काय झालं बघा… दोन वर्ष तो किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार होता, रिझल्ट्स मिळाले नाहीत, त्याला हटवलं. आपण एमएस धोनीबद्दल बोलतो, आपण रोहित शर्माबद्दल बोलतो. धोनीने तीन वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या गळ्यात चार वेळा जेतेपदाची माळ पडली आहे. त्यांनी स्वतःला सिद्ध केल्यामुळे ते इतकी वर्ष कर्णधारपदी कायम आहेत. रोहित शर्माने आठ वर्षात एकदाही आयपीएल जिंकली नसती, तर त्याला हटवलं असतं. वेगवेगळ्या व्यक्तींसाठी मोजमापाची वेगवेगळी परिमाणं नसावीत” अशी स्पष्ट भूमिका देखील गंभीरने मांडली.
महत्वाच्या बातम्या
- बिहारच्या जनतेने नवा रेकॉर्ड रचावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
- सचिन सावंत यांना तज्ञ समितीपेक्षा अधिक अक्कल आहे का ?
- कांद्याचे भाव स्थिरच, आता पुन्हा आवक घटली!
- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला प्रवक्त्यांना ‘हा’ कानमंत्र
- मंदिरे उघडलीच पाहिजे अशाप्रकारचा हट्ट का? हेमंत टकले यांचा भाजपला सवाल


