Share

‘मी निवृत्त झाले’ म्हणून धक्का देणारी पी. व्ही. सिंधू एशियन स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पुसारला वेंकटा सिंधू म्हणजेच भारतीय बॅडमिंटन पटू पी. व्ही. सिंधू ऑलिंपिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटन मध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी आणि सुवर्णपदक मिळवणारी देखील ती पहिली भारतीय ठरण्याचा मान देखील केली पटकावला आहे. तर सध्या कोरोनाच्या काळात क्रीडा विश्वावर अनेक निर्बंध आले असताना खेळाडूंच्या शारीरिक तंदुरुस्ती संदर्भात समस्या निर्माण होण्याचं शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी आपल्या शरीराच्या पोषण आणि तंदुरुस्तीवर काम करण्यासाठी काही दिवसांसाठी लंडनला गेली होती. त्यानंतर तिने अचानक ‘मी निवृत्त झाले’ असे ट्विट करत क्रीडा रसिकांना धक्का दिला होता.

आता महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने म्हटले की, कोरोनादरम्यान आत ती पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि खेळण्यासाठी सज्ज झाले. ती म्हणाली, “नियमित नियोजनाला अचानक रोखणे सोपे नसते. मात्र, असे करणे स्वत:साठी महत्त्वाचे होते. मी घरात काम करत स्वत:ला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची मला मदत झाली. मी माझ्या कुटुंबासोबत खूप वेळ घालवला. मी कोर्टवर जाऊ शकत नव्हते. त्यामुळे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा थोडे कठीण वाटले. आता मला वाटते की, मी कोर्टवर जाण्यासाठी तंदुरुस्त असून स्पर्धा खेळण्यासाठी तयार आहे.’

सिंधूने सप्टेंबरमध्ये डेन्मार्क ओपनमधून माघार घेतली होती. ती थॉमस व उबर कपमध्ये खेळण्यासाठी तयार होती, मात्र स्पर्धा स्थगित झाली. “मी एशियात स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज आहे. मी दीर्घकाळानंतर कोर्ट पुनरागमन करेल. सराव चांगला सुरू अाहे. विश्रांतीने मला एक खेळाडू म्हणून खूप शिकवले आणि सुधारणा करण्यास मदत केली. मी या विश्रांती काळात खूप सकारात्मक गोष्टी शिकण्यात यशस्वी ठरले, असेही तिने सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!