🕒 1 min read
नाशिक- राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजार होत असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही, कुणीही कारवाई पासून वाचणार नाही, असा इशारा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. काल नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.
नागरिकांनी दीपावली आनंदात साजरी करावी, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाके वाजवून प्रदूषण होणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे वायू प्रदूषण होऊन श्वसनाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी यंदा फटाके वाजवण्यावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.
हिवाळी अधिवेशनाबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत ते म्हणाले की,नागपूर येथील आमदार निवास येथे कोविड सेंटर सुरू आहे. तसेच कोविड विलागीकरण कक्ष तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागपूरला अधिवेशन नको अशी आमदारांची मागणी आहे. आमदारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विरोधी पक्ष नेते व कामकाज सल्लागार समितीचे सदस्य याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेतील.
"राज्यात रेशनचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही" – छगन भुजबळ
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेले छगन भुजबळ अलीकडे खूपच विनोदी बोलतात… pic.twitter.com/gLKiUA6rd9— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 6, 2020
दरम्यान, भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत छगन भुजबळ यांच्यावर खोचक टीका केली आहे. ‘राज्यात रेशनचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही’ या छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर भातखळकर यांनी टीका केलीय. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगातून जामिनावर बाहेर आलेले छगन भुजबळ अलीकडे खूपच विनोदी बोलतात, असे म्हणत भातखळकर यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय.
महत्वाच्या बातम्या
- आक्रोश मोर्चा : मराठा आंदोलकांना रोखलं; मोजक्या आंदोलकांना बसने मुंबईला पाठवणार!
- सचिन सावंत यांना तज्ञ समितीपेक्षा अधिक अक्कल आहे का ?
- कांद्याचे भाव स्थिरच, आता पुन्हा आवक घटली!
- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला प्रवक्त्यांना ‘हा’ कानमंत्र
- मंदिरे उघडलीच पाहिजे अशाप्रकारचा हट्ट का? हेमंत टकले यांचा भाजपला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

