Share

Eknath Shinde : “बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुक्करं, नाल्याची घाण, रेडा…”; आदित्य ठाकरे आणि राऊतांच्या वक्तव्यानंतर शिंदे आक्रमक!

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीचा आज (28 जून, मंगळवार) आठवा दिवस आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार गेल्या सात दिवसांपासून अडचणीत सापडले आहे. याचदरम्यान युवासेना प्रमुख आणि मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला आहे. अशातच आता स्वतः एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत दोघांवर निशाणा साधला आहे.

एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याची घाण,रेडा,कुत्रे,जाहील व मृतदेह म्हणायचे,त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय?, असा सवाल उपस्थित करत शिंदे यांनी हे ट्विट केलं आहे.

दरम्यान, याआधी आदित्य ठाकरे म्हणाले कि, “बरं झाली घाण गेली. ज्यांना मदत केली, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचे वाईट वाटते, असे ते म्हणाले होते. तर 40 आमदारांचे मृतदेह थेट गुवाहाटीमधून येतील. त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू. गुवाहाटीमध्ये एक मंदिर आहे. या मंदिरात रेड्याचा बळी दिला जातो. आम्ही 40 रेडे पाठवले असल्याचेही वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!