Share

Eknath Shinde | “ज्यांच्या स्वतःबद्दल…”; अशोक चव्हाणांच्या दाव्यावर शिंदे गटाचा पलटवार!

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करुन सत्ता मिळवली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती केल्यामुळे त्यांनी हा बंड केला असल्याचं शिंदेंनी सांगितलं होतं. मात्र, शिंदेंच्या या कारणावर आता प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला असून शिंदेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यानंतर भाजप पक्षाच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशातच शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आलं आहे.

एकनाथ शिंदे गटाची पहिली प्रतिक्रियाः

ज्या चव्हाणांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर ‘आदर्श’ घालून दिला त्यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व देण्याची गरज नसल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे. तसेच चव्हाण स्वतःबद्दल गेल्या काही दिवसांपासून नाराज असून इकडे तिकडे जाणार, आशा बातम्या येत आहेत, जे स्वतः विधान परिषदेच्या निवडणुकीला गैरहजर राहिले ते आता माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत असल्याचा आरोप म्हस्केंनी केला आहे.

काय म्हणाले अशोक चव्हाणः

२०१४ मध्ये शिवसेनेकडून काँग्रेसला प्रस्ताव आला होता आणि प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास त्यावेळी सुचवण्यात आलं होतं. मात्र, विशेष बाब म्हणजे त्यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे देखील होते. त्यावेळी चर्चगेट येथील कार्यालयात शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटलं होतं, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता.

दरम्यान, ४० आमरांसोबत एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि भाजप सोबत युती करण्याची मागणी केली. यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. एवढंच नाही तर यानंतर राज्यात सत्तांतर झाली आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. मात्र, एकनाथ शिंदे एवढ्यावरच शांत नाही राहिले. त्यांनी थेट शिवसेना पक्षावर आणि धनुष्यबाण चिन्हावर देखील दावा केला आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात सुरु असून लवकरच निवडणूक आयोग यावर निर्णय देणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!