मुंबई : शिवसेना पक्ष संपूर्णपणे विसकळीत झाला असून, राज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि ठाकरे गट असं चित्र पाहायला मिळतं आहे. या गटातील नेते एकमेकांविरोधात आरोप, टीकेबाजी करत असतात. अशातच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे 15 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते, असा दावा केला आहे. खैरेंनी केलेल्या वक्तव्यावर आता शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले अर्जुन खोतकर ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठीच हे विधान कलेले असावे,असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे. प्रसार माध्यमांशी खोतकर यांनी संवाद केला. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, चंद्रकांत खैरे हे ज्येष्ठ नेते आहेत. मागील ४० वर्षांपासून आम्ही सोबत काम करतो. खैरे कोणत्या आधारावर बोलले याची मला कल्पना नाही.
तसेच, खैरे काय बोलले हे ऐकल्यानंतरच त्यावर बोलणे उचित राहील. मात्र एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सर्व स्तरातून होत आहे. त्याचा हा भाग असू शकतो, असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- BJP | “… तर २०१४ मध्ये उद्धव ठाकरेच काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्यासाठी गेले असतील”; बावनकुळेंचा पलटवार
- Uddhav Thackeray | धनुष्यबाण कुणाला मिळेल? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी काय? जाणून घ्या सविस्तर
- Chhagan Bhujbal | मी कोणाला अपमानकारक बोललो नाही, मी केवळ इतिहास सांगितला – भुजबळांचं ‘त्या’ वक्तव्यावरुन स्पष्टीकरण
- Maruti Car Update | मारुती सुझुकीच्या ‘या’ दोन SUV पुढच्या वर्षी मार्केट मध्ये धुमाकूळ घालण्यास सुसज्ज
- Shivsena । “एकनाथ शिंदे १५ आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते, पण…”, चव्हाणांनंतर खैरेंचा मोठा दावा


