Share

Chandrashekhar Bawankule | सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रावेळी लोकांच्या प्रेमाबद्दल आपलं मत व्यक्त करताना सुप्रिया सुळेंनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तो काळ आता गेला आहे, शरद पवार याचं नाव आणि काम वापरून तुम्ही किती दिवस मोठे व्हाल? असा खोचक सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुप्रिया सुळे यांना विचारला आहे. तसेच स्वत:चं कर्तृत्वही दाखवावं लागेल, शरद पवारांनी त्यांच्या आयुष्यात काम केलं आहे, पण त्यांच्या कामावर दुसरे तरून जातील असा काळ आता गेला आहे, जो पदावर आहे, तो किती काम करतो हे आता पाहिलं जातं आणि आता जनता तर बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा विचाराची आहे, असा टोला बावनकुळेंनी लगावला आहे.

संपूर्ण महाराष्ट्राने हे पाहिलं आहे की शरद पवार विरोधात गेले की ते दौऱ्यावर जातात आणि त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही, पण काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

दरम्यान, शरद पवारांनी महिलांसाठी आरक्षण आणलं, महिला उंबरठा ओलांडून निर्णय प्रक्रियेत आल्या, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदमध्ये महिला आल्या, आता आपली इच्छा आहे की, लोकसभा आणि विधानसभेमध्ये देखील महिला यायला हव्यात, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसची तर आरक्षणाची मागणी आहेच, पण मी आरक्षणातून लढणार नसल्याचं सुळेंनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!