🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पोर्नोग्राफी प्रकरणात अटक केल्यापासून शिल्पालाही प्रश्न विचारले जात आहेत. पतीला अटक झाल्यापासून शिल्पाला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. यामुळे तिच्या करियरवर देखील परिणाम होणार असल्याचे म्हणत जात होते. कारण या प्रकरणानंतर ती कोणत्याही कार्यक्रम दिसली नाही. मात्र पतीच्या अटकेनंतर शिल्पा पहिल्यांदा एका कार्यक्रमात दिसणार असल्याची शक्यता आहे.
कोविड-१९ रिलीफ फंडसाठी ‘We For India: Saving Lives, Protecting Livelihoods’ हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमातून मिळालेले पैसे हे ऑक्सिजन कन्सेंट्रेटर, व्हेंटिलेटर, औषधे, आयसीयू युनिट बनवण्यासाठी वापरण्यात येतील. या कार्यक्रमात अर्जुन कपूर, दिया मिर्झा, एड शिरीन, करण जोहर, परिणीती चोप्रा, सैफ अली खाना, सारा अली खान आणि स्टीव्हन स्पीलबर्ग उपस्थित राहणार आहेत. या सगळ्यांसोबत शिल्पा शेट्टी देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याचे म्हटले जात आहे. हा कार्यक्रम ३ तासांचा असणार हा कार्यक्रम फेसबूकवर लाईव्ह असणार आहे.
दरम्यान, ‘सुपर डान्सर-४’ या शो मध्ये शिल्पा परीक्षक म्हणून काम करत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून शिल्पाने शेट्टी ‘सुपर डान्सर-४’ शूटिंग करणं रद्द केलं आहे. त्यामुळे आता या शोमध्ये शिल्पाच्या जागी वेगवेगळे पाहुणे कलाकार पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मंत्री गुलाबराव आणि नवाब भाई सारखे येड्या सारखं का बडबड करत हे आता कळले’
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- ‘मंत्रालय ते चंद्रपुर मद्यधुंद करण्याचा निर्णय या ठाकरे सरकारने घेतलाय’; भाजपचा हल्लाबोल
- ‘दोन डोस झाले असतील तर आता मंत्रालयात जाणार का?’; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- ‘कोरोना हा काही सरकार मान्य कार्यक्रम नाही; आंदोलनं कसली करताय ?’, मुख्यमंत्री भडकले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
