🕒 1 min read
मुंबई : राज्याचा कारभार जिथून चालवला जातो, त्या मंत्रालयात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मंत्रालयातील उपहारगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. मंत्रालयात राजपात्रित अधिकाऱ्यांच्या उपहारगृहाच्या खालील बाजूस हे एक रुम आहे. तिथे हे धक्कादायक चित्र आढळून आले.
या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्या कशा? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याचं कारणही महत्वाचं आहे. संपूर्ण राज्याचा कारभार या मंत्रालयातून पाहिला जातो. जर सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते. पण मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा? असा प्रश्न सध्या सर्वच स्तरांतून व्यक्त केला जात आहे. आधीच चंद्रपुरातील दारू बंदी उठवल्याने महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. आता या प्रकरणामुळे सरकारच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
आता कळले..
ठाकरे सरकार मधील काही मंत्री..
गुलाबराव आणि नवाब भाई सारखे येड्या सारखं का बडबड करत असतात..
झिंगझींग झिंगाट मंत्रालयातच चालू असेल तर मग हे शुद्धीत कसे असणार?— Nitesh Rane (@NiteshNRane) August 10, 2021
या गंभीर प्रकरणावर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे. ‘आता कळले ठाकरे सरकार मधील काही मंत्री गुलाबराव आणि नवाब भाई सारखे येड्या सारखं का बडबड करत असतात. झिंगझिंग झिंगाट मंत्रालयातच चालू असेल तर मग हे शुद्धीत कसे असणार?,’ अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली आहे. दरम्यान, ही बाब शरमेची असून इतकी सुरक्षितता असताना दारुच्या बाटल्या मंत्रालयात कशा गेल्या याची चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देशभरातील १,२८,३३५ शाखा फडकविणार राष्ट्रध्वज
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- ‘मंत्रालय ते चंद्रपुर मद्यधुंद करण्याचा निर्णय या ठाकरे सरकारने घेतलाय’; भाजपचा हल्लाबोल
- ‘दोन डोस झाले असतील तर आता मंत्रालयात जाणार का?’; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- ‘कोरोना हा काही सरकार मान्य कार्यक्रम नाही; आंदोलनं कसली करताय ?’, मुख्यमंत्री भडकले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
