Share

शिल्पा शेट्टी मुंबई पोलिसांच्या रडारवर; क्राईम ब्रांच चौकशीसाठी बोलावणार?

Published On: 

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्राला कोर्टाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांनतर आज झालेल्या सुनावणीत राज कुंद्रा आणि रायन थॉर्पे यांना आणखी पुढील ७ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आता मुंबई क्राईम ब्रांचच्या रडारवर आहे. तिची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात शिल्पा शेट्टी कितपत सहभागी आहे याचा शोध आता मुंबई पोलीस घेऊ शकते. राज कुन्द्राच्या विनय इंडस्ट्रीजमध्ये शिल्पाचा आर्थिक वाटा होता का? ती किती दिवस विनय इंडस्ट्रीजच्या संचालक पदावर होती? अशा सर्वच प्रश्नांचा उलगडा आता मुंबई क्राईम ब्रांच करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेला राज कुंद्राबाबत आता आंतरराष्ट्रीय कनेक्शन चर्चेत येत आहे. मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की, व्हॉट्सअप  चॅटवर त्यांना माहिती मिळाली आहे की, राज कुंद्रा १२१ लाख व्हिडिओ १२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर विकले असल्याचे बोलत आहेत. मुंबई पोलिस म्हणाले की, ही आंतरराष्ट्रीय स्तराची बाब असल्याचे दिसते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!