मुंबई : राज्यातील पावसाने गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात हाहा:कार माजला असून विविध दुर्घटनांमध्ये अनेकांचे बळी गेल्याचे चित्र आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पूराची स्थिती उद्भवल्याने अनेक जण आपापल्या घरात अडकले आहेत. कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. आतापर्यंत यात ४० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. त्याचसोबत जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जातील. आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.
अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत व जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 23, 2021
तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीय. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून या घटनेवर दु:ख व्यक्त करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळई गावात झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना, पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून प्रत्येकी दोन लाख रुपयांचे सानुग्रह मदत तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे’ असंही या ट्विटमध्ये म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
- तळई दुर्घटना; पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना मदत जाहीर
- ‘मुख्यमंत्री मंत्रालयात… हा दिवस उगवण्यासाठी राज्यात शेकडो बळी जावे लागले’
- ‘पूर परिस्थितीतही मुख्यमंत्री मातोश्रीवर आहेत, आम्ही थेट बोटीत बसून निर्णय घ्यायचो’
- ‘वर्षभर घरी बसून ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची व्याख्या बदललीच आहे की..’ भाजपचा टोला
- ‘काँग्रेसने मेहनतीने बांधलेला देश मोदी सरकार लुटायला निघाले’, काँग्रेसचा हल्लाबोल


