🕒 1 min read
मुंबई : अश्लिल व्हिडीओ प्रकरणात काही दिवसापुर्वी मुंबई पोलिसांनी उद्योजक राज कुंद्राला अटक केली. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडे सबळ पुरावे असल्याची माहिती समोर आली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अश्लिल व्हिडीओ प्रकरणात जेव्हा क्राइम ब्रांचचे अधिकारी राद कुंद्राच्या घरी पोहोचले होते. तेव्हा क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यासमोरच शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रावर भडकली. यावेळी ती म्हणाली,’ तु किती मोठा घोळ घातला आहे याची तुला कल्पना तरी आहे का? मला याबद्दल तु काहीच कसे सांगितले नाही. तुझ्या या कारस्थानामुळे आपल्या कुंटुबाचे नाव खराब झालं आहे. ‘ असे म्हणत ती राजवर ओरडत होती. या वादानंतर शिल्पाने रडत असातनाच पोलिसांना आपला जवाब दिला.
राज कुंद्राच्या या प्रकरणामुळे शिल्पाच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे. ती जज असलेला ‘सुपर डान्सर’ हा शो तिला सोडावा लागला. तसेच आगामी काळात तिला चित्रपट सृष्टीत काम मिळण्याची शक्यताही कमी आहेत. तसेच या प्रकरणामुळे ती करत असलेल्या जाहीरातीही तिच्या हातातून जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. या प्रकरणामुळे शिल्पा शेट्टीच्या प्रतिमेला खुप मोठा धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या बेशरमपणाचा कळस, मदत पोहचण्याआधी जाहिरात पोहोचली-भाजपची टीका
- सोनू सूदने केला ढाबा सुरु; पाहायला मिळाला चपाती तयार करताना
- माहीचा ‘तो’ लुक सोशल मीडीयावर तुफान व्हायरल
- श्रीलंका दौऱ्यातील अपयशी कामगीरीमुळे संजुचे करिअर धोक्यात
- पृथ्वीच्या संघातील पुनरागमनामुळे कर्णधार धवनचीच जागा धोक्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
