मुंबई: महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती कोपली असताना भाजप-सेनेने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली नसल्याचे दिसून येते. आता भाजपने पुन्हा एकदा समाज माध्यमावर पोस्ट करत शिवसेनेवर टीका केली आहे. भाजपने शिवसेनेने केलेल्या जाहिरातीचा एक व्हिडीओ शेअर करत सेनेवर निशाना साधला आहे.
महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबे उद्धवस्त झाली आहेत. कोकण-पश्चिम महाराष्ट्रावर नैसर्गिक संकट कोसळले आहे. राज्य सरकार या संकटात जनतेचा आधार बनून साथ देत आहे. “माणुसकी जपण्याची, पारखण्याची हीच ती वेळ” अशा आशयाची शिवसेनेची जाहिरात भाजपने समाज माध्यमावर शेअर करत ‘शिवसेनेच्या बेशरमपणाचा कळस, मदत पोहचण्या आधी जाहिरात पोहोचली.’ अशी टीका केली आहे.
https://twitter.com/BJP4Mumbai/status/1419847349266829314
दरम्यान अनेक पूरग्रस्त भागात प्रशासनाची मदत पोहचली नसल्याचे पूरग्रस्तांनी माध्यमांसमोर म्हटले. तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतः पूरग्रस्त भागाचे दौरे करत परिस्थितीचा आढावा घेतला. याचेच गुणगान करणारी शिवसेनेची जाहिरात शिवसेना कार्यालय दादर द्वारा प्रकाशित करण्यात आली आहे. भाजपने ही जाहिरात शेअर करत शिवसेनेवर निशाना साधला आहे. शेअर केलेली जाहिरात खरी की खोटी ,जुनी आहे की नवी याची अधिकृत माहिती अजून मिळालेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- माहीचा ‘तो’ लुक सोशल मीडीयावर तुफान व्हायरल
- श्रीलंका दौऱ्यातील अपयशी कामगीरीमुळे संजुचे करिअर धोक्यात
- पृथ्वीच्या संघातील पुनरागमनामुळे कर्णधार धवनचीच जागा धोक्यात
- ‘त्यांचे बोलणे कठोर आहे, गैरसमज करू नका’ भास्कर जाधवांनी अरेरावी केल्यानंतर महिलेची प्रतिक्रिया
- पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर


