मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पोर्नोग्राफी प्रकरणात अटक केल्यापासून शिल्पालाही प्रश्न विचारले जात आहेत. पतीला अटक झाल्यापासून शिल्पाला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. यातच आता शिल्पाच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईवर फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आयोसिस स्लिमिंग स्किन सलून आणि स्पा नावाने शिल्पा शेट्टी आणि त्यांची आई सुनंदा शेट्टीने कंपनी सुरू केली आहे. याची शाखा राजधानी दिल्लीत खोलण्याच्या नावावरून अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला. त्यांना सेंटर देण्याच्या नावावरून करोडो रुपये वसूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात विभूतिखंड ठाणे प्रकरणात ओमेक्स हाइट्समध्ये राहणारे निवासी ज्योत्स्ना तौहान आणि हजरतगंज पोलिस ठाण्यात रोहित सिंहने फसवल्याची तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. ज्यामध्ये शिल्पा आणि तिची आई सुनंदाची भूमिका समोर आली आहे. त्यानंतर आता या दोघांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पॉर्नोग्राफिक फिल्म्सप्रकरणी तुरुंगात असलेल्या राज कुंद्राची जामीन याचिका बुधवारी फेटाळण्यात आली. पॉर्नोग्राफिक फिल्म्स बनवून काही अॅप्सच्या माध्यमातून त्या प्रसारित केल्याचा आरोप राज कुंद्रावर आहे. न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कुंद्राने जामीन याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतर पती राज कुंद्रानंतर शिल्पाच्या अडचणींमध्ये अधिक वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सगळं केंद्राने द्याव मी फक्त घरात बसणार, नाहीतर मर्सिडीज चालवणार’; भाजपची टीका
- 102 व्या घटना दुरुस्तीत बदल करणारे विधेयक सरकार आज लोकसभेत मांडणार
- पुण्यातील निर्बंध शिथिल केल्यानंतर आता सोलापुरातील निर्बंध शिथिल करण्याची होतेय मागणी
- मराठा आरक्षण : पुण्यात आज राज्यस्तरीय बैठक; संभाजीराजेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
- वाढदिवसाच्या मिरवणुकीत तलवार नाचवली,अबू आझमींसह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल


