मुंबई : उद्योजक राज कुंद्राला अश्लिल व्हिडीओ प्रकरणात १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. राज कुंद्रा यांना पोर्नोग्राफी प्रकरणात जामीन मिळाला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने 50 हजारांच्या जातमुचलक्यावर राज कुंद्रा यांना जामीन दिला आहे. राज कुंद्रावर अश्लील व्हिडीओ बनवून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणात चर्चित असलेली अभिनेत्री शर्लिन चोप्रविरोधात राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने मानहानीचा गुन्हा दाखल केली आहे.
राज कुंद्रा प्रकरणामध्ये क्राइम ब्रांचने शर्लिनची चौकशी केली होती. या प्रकरणातील ती महत्त्वाची साक्षीदार असल्याचे म्हटले जात होते. राज कुंद्रा प्रकरणात शर्लिनची चौकशी करण्यात आली होती. चौकशीदरम्यान, शर्लिन चोप्राने या प्रकरणामध्ये बरेच धक्कादायक खुलासे केले होते.
काही दिवसांपूर्वी शर्लिन चोप्राने राज कुंद्रावर गंभीर आरोप केले होते. मानसिक आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी शर्लिनने १४ ऑक्टोबर रोजी ही तक्रार दाखल केली. सोशल मिडीयावर तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती म्हणते की, ‘मी राज कुंद्राविरोधात लैंगिक छळ, फसवणूक व धमक्या दिल्याची तक्रार केली आहे. त्याने अंडरवर्ल्डची धमकी दिली. नीट लक्षात असू द्या,की तुम्ही माझ्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत,’ असे तिने म्हंटले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चंद्रकांत पाटील कर्तबगार, निष्कलंक, छळकपट, विश्वासघात न करणारे नेते’; भाजप नेत्याचे स्तुतीसुमने
- ‘मराठवाड्याने कोकणातील १६८ टीएमसी पाणी विसरावे, याकरिता जयंत पाटलांकडून १९ टीएमसीचे गाजर’
- ‘लोकांना सिनेमा आणि नाट्यगृहापर्यंत पुन्हा कसे आणायचे हे मोठे आव्हान’, संजय राऊतांनी व्यक्त केली चिंता
- हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा; नारायण राणेंचे मुख्यमंत्र्यांना प्रहारमधून आव्हान
- अभिनेत्रीच्या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

