सांगली : चंद्रकांत पाटील राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करत मोठे झाले आहेत. स्वत:च्या हिंमतीवर अभाविप आणि संघाच्या शिस्तीत नैतिकतेच्या बळावर राज्याचे महसूल मंत्री झाले आहे. कर्तबगार, निष्कलंक राहिले, छळकपट, विश्वासघात केला नाही. चंद्रकांत पाटलांचा पाठीवर हात हाच आमच्यासाठी सोन्याचा मुकूट आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर असे स्तुतीसुमने भाजप प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी उधळले आहेत. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर जहरी टीका केली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा उल्लेख एकेरी करत टीका केली होती. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटलांवर प्रचंड टीका केली होती. सांगलीत जयंत पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटलांना खडे बोल सुनावले होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, सत्ता गेल्यानंतर काही लोकांमध्ये भ्रमिष्टपणा येतो, तर काही लोकांचा तोल जातो. चंद्रकांत पाटील यांच्या बाबतीत यातलं काय झालं, हा संशोधनाचा विषय आहे. राजकारणात एकेरी भाषा वापरणं ही महाराष्ट्रची संस्कृती कधीच नव्हती. मात्र चंद्रकांत पाटील यांनी एकेरी भाषा वापरली, हे दुर्दैवी आहे. शरद पवार यांचे बोट धरून आपण राजकारणात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. मग चंद्रकांत पाटील तरी शरद पवारांना एकेरी भाषा कसे वापरू शकतात? बहुतेक चंद्रकांत पाटील हे खासगीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी पण एकेरी भाषेत वापरत असावेत. त्यांना तशी सवय असावी,’ असं जयंत पाटील म्हणाले होते.
जयंत पाटलांवर टीका करताना पृथ्वीराज पवार म्हणाले, जयंत पाटलांचे नाव आले की घोडेबाजार, कुरघोड्या, करेक्ट कार्यक्रम, जिरवाजिरवी याचीच चर्चा होते. राज्यातील जनतेने जयंतरावांना आणि त्यांच्या पक्षाला स्पष्टपणे नाकारल्याचे त्यांची आमदार संख्या ओरडून सांगत आहे. जुगाड करून ते सत्तेत आले आहेत. ही सत्ता पचता पचेना.
अनेक नेत्यांची सदसद्विवेकबुद्धी खड्ड्यात गेली आहे. संकटांनी जनता होरपळली आहे. मात्र, शंभर कोटी वसुली, मारहाण, मंत्र्याच्या पत्नीला अडकावणे, याच कामात ते व्यस्त आहेत. डोक्यात सत्तेची हवा आहे. त्यात जयंतराव आघाडीवर आहेत. महापालिकेतून नागरिकांनी त्यांचे पार्सल दोनवेळा अनवाणी पायाने परत पाठवले. आता सरळ सत्ता येत नाही म्हटल्यावर घोडेबाजार करून महापौर केला आहे. त्याची परतफेड व्याजासह होईल. असा इशराही पृथ्वीराज पवार यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या बातम्या
- ‘जाऊ तिथं खाऊ, चोर चोर मावसभाऊ व निम्म निम्म वाटून खाऊ असे हे महाखाऊ’, सदाभाऊंचा हल्लाबोल
- ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दिवाळीत काळे झेंडे दाखवून स्वागत करा’, राजू शेट्टींचे आवाहन
- भारतीय सैन्याकडून ‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा
- नाना पटोले यांच्यावर नाराजी, सचिन सावंतांचा काँग्रेस प्रवक्तेपदाचा तडकाफडकी राजीनामा
- ‘पुण्याचे महापौर पद आम्हाला द्या!’, रिपाइंचे अध्यक्ष आठवलेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
