रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या ‘प्रहार’ वर्तमानपत्रामधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधलं आहे. आजच्या प्रहारमध्ये ‘हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा’ अशा मथळ्याखाली नारायण राणेंचा घणाघाती प्रहार वाचा उद्याच्या अंकात, असं सदर छापून आलं आहे. गुरुवारच्या प्रहार पेपरच्या अंकात ‘हार आणि प्रहार’ या शिर्षकाखाली नारायण राणे थेट उद्धव ठाकरेंना टिकेचे लक्ष्य करणार आहेत.
‘प्रहार’च्या आजच्या अंकात याबाबत सांगितलं असून यात म्हटलं आहे की, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केंद्रीय तपास यंत्रणांवर बेलगाम टीका करणाऱ्या, सत्तेच्या लोभासाठी हिंदुत्वाची कास सोडलेल्या, ज्यांच्या मदतीनं पक्ष वाढवला त्या भाजपवर बेछूट आरोप करणाऱ्या आणि केंद्र सरकारकडे सतत झोळी पसरवून त्यांनाच दोष देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा खणखणीत आणि घणाघाणी प्रहार, ‘हार आणि प्रहार’, उद्याच्या अंकात वाचा, असं प्रहारमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, हिंदुत्व धोक्यात आहे ते परक्यांपासुन नाही तर ह्या नवहिंदुंपासुन धोक्यात आहे. मी पूर्वी बोललो होतो की माय मरो आणि गाय जगो हे आमचे हिंदुत्व नाही. घराबाहेर पडल्यावर देश हा माझा धर्म. जर या धर्माआड कोणी आल तर कडवट देशाभिमानी म्हणून आम्ही उभे राहू. लोकशाहीत सर्वात मोठ शस्त्र म्हणजे मत. त्याच्या आधारे तुम्ही रंकाचा राव आणि रावाचा रंक करु शकता. सामान्य जनता सर्वात शक्तीमान आहे, असं मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये म्हंटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांच्या शोधासाठी केंद्रीय तपास यंत्रणा पुन्हा सक्रिय, पकडण्यासाठी परत छापेमारीची शक्यता
- ‘चंद्रकांत पाटील कर्तबगार, निष्कलंक, छळकपट, विश्वासघात न करणारे नेते’; भाजप नेत्याचे स्तुतीसुमने
- ‘मराठवाड्याने कोकणातील १६८ टीएमसी पाणी विसरावे, याकरिता जयंत पाटलांकडून १९ टीएमसीचे गाजर’
- ‘लोकांना सिनेमा आणि नाट्यगृहापर्यंत पुन्हा कसे आणायचे हे मोठे आव्हान’, संजय राऊतांनी व्यक्त केली चिंता
- भाजपला आघाडी द्या अन् गाव जेवण घ्या; चंद्रकांत पाटलांची देगलूरच्या कार्यकर्त्यांना ऑफर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
