Share

‘लोकांना सिनेमा आणि नाट्यगृहापर्यंत पुन्हा कसे आणायचे हे मोठे आव्हान’, संजय राऊतांनी व्यक्त केली चिंता

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: लॉक डाऊन काळात अनेकांनी आपला रोजगार गमावला. अनेकांचे लहान-मोठे व्यवसाय बंद पडले ही चिंतेचीच बाब आहे. मनोरंजनाचा मोठा व्यवसाय कोसळला आहे. मुंबईतल्या चित्रपट उद्योगावर लाखो लोक अवलंबून आहेत. चित्रपटाची मायानगरी हे मुंबईचे वैभव आहे. ते वैभवच मधल्या काळात झाकोळून गेले. पडद्यामागच्या अनेक कलाकारांच्या, तंत्रज्ञांच्या चुली विझल्या. सिनेमागृहे, नाटय़गृहे ओस पडली. त्यावर अवलंबून असलेले कर्मचारी बेकार झाले. मराठी नाटय़सृष्टीलाही धक्काच बसला. आता या सगळ्यातून उभे राहायचे असले तरी ते सोपे नाही. लोकांना सिनेमा आणि नाटय़गृहापर्यंत पुन्हा कसे आणायचे, हे मोठेच आव्हान असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखात म्हटले आहे.

मराठी नाटक हे आपल्या संस्कृतीचे गौरवस्थान आहे. मराठी रंगभूमीचे एक म्युझियम सरकार मुंबईत उभे करीत आहे. मराठी भाषा भवनही उभारणार आहेत. ते चांगलेच आहे. पण मराठी सिनेमा, मराठी नाटक हा जो मराठी संस्कृतीचा कणा आहे तोच मोडून पडला आहे. त्यांना विशेष आधाराची गरज आहे. जे नाटक सिनेमांचे तेच हॉटेल्स, रेस्टॉरंटवाल्यांचे. मुंबई चोवीस तास जागी आहे असे म्हणतात ते याच खाद्य संस्कृतीमुळे, पण लॉक डाऊनच्या निर्बंधांमुळे मुंबईसह महाराष्ट्रातील हा जिताजागता व्यवसायही बंद पडला. रेस्टॉरंट, जागोजागचे गजबजते ढाबे बंद पडल्याने अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. आता हा व्यवसाय नव्याने सुरू होत असला तरी पोलीस व स्थानिक प्रशासनाने या व्यावसायिकांचे फालतूचे शोषण करू नये हीच अपेक्षा. असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान महाराष्ट्रात जम्बो कोविड सेंटर्स, प्राणवायूचा पुरवठा, औषधांचा पुरवठा, कडक निर्बंध, सोशल डिस्टन्सिंग याबाबत ठाकरे सरकार जागरूक राहिल्यानेच कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकला व आज दिवाळीच्या तोंडावर लॉकडाऊनचे टाळे उघडता आले. निर्बंध उठलेच आहेत. तेव्हा एकमेकांच्या सहकार्याने, नियम-कायद्यांचे पालन करून मुंबई-महाराष्ट्रास कामधंद्यास लागू द्या. जगा आणि जगू द्या. उगाच आडवे येऊन लोकांचा छळ करू नका. असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!