Share

‘मराठवाड्याने कोकणातील १६८ टीएमसी पाणी विसरावे, याकरिता जयंत पाटलांकडून १९ टीएमसीचे गाजर’

Published On: 

🕒 1 min read

बीड : पाण्याच्या बाबतीत मराठवाड्यातील नेते उदासीन व लोकांना काही कळत नाही या गोष्टींचा फायदा घेतला जात आहे. यामुळेच जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मराठवाड्याने कोकणातील १६८ टीएमसी पाणी विसरावे याकरिता गोदावरीच्या मध्य उपखोऱ्यात अतिरिक्त १९ टीएमसी पाण्याचे गाजर दाखविल्याची टीका मराठवाड्यातील जलतज्ञांकडून होत असल्याचा दावा मराठवाडा राज्य संघर्ष समितीच्या वतीने सदस्य शिवाजी कवठेकर यांनी केला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अरबी समुद्रात वाहून जाणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी कोकणातून गोदावरी खोऱ्यात आणून टाकणार व मराठवाड्यातला दुष्काळ हटवणार अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.कारण कोकणातून आणावयाच्या या १६८ टीएमसी पाण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह औरंगाबादच्या विभागीय कार्यालयासमोर जानेवारी २०२० मध्ये एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. तसेच पहिल्या लॉकडाउनच्या काळात फेसबुकवर ऑनलाइन पाणी परिषदसुद्धा घेतली होती.

मागच्या दोन वर्षांच्या काळात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रकल्पासंदर्भात मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी व मंत्र्यांसोबत दोन-तीन वेळा बैठकाही घेतल्या होत्या असे जलसंपदा खात्यातर्फे प्रसार माध्यमातून वेळोवेळी सांगण्यातही आले होते. पण या बैठकांमधून कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात आणून सोडण्याबद्दल निर्णय काय घेण्यात आला? हे मात्र कधी सांगितले नव्हते. आणि आता अचानकच गोदावरीच्या खोऱ्यात अतिरिक्त १९ टीएमसी पाणी मराठवाड्याला उपलब्ध होईल अशी घोषणा जलसंपदा मंत्र्यांनी केली आहे.

गोदावरी पाणी तंटा लवादाच्या (१९७५)पाणी वापराच्या हिशोबात चूक होती आणि आता ती चूक दुरुस्त करण्यात आली असल्याचे कारण या १९ टीएमसी पाण्याच्या उपलब्धतेसाठी देण्यात आले आहे. जे हास्यास्पद,लाबाडीचे व दुष्काळग्रस्त मराठवाड्याला जोपारून ठेवणारे आहे. पण मराठवाड्यातील लोकांनी कोकणातील पाणी विसरावे याकरिता ही घोषणा करण्यात आली असल्याचे मराठवाड्यातील जलतज्ञ यांचे म्हणणे आहे. कारण या सरकारमध्ये असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील नेते मंडळींची मराठवाड्याला न्याय देण्याची भूमिका कधीच राहिलेली नाही हा इतिहास आहे.

खरे म्हणजे, कोकणातील पाणी गोदावरीत आणण्यासाठी लागणारा खर्च हा एक लाख कोटींपेक्षा अधिक असल्यामुळे तो करण्याची ऐपत व नियत हे दोन्हीही या सरकारकडे नाही. पण ते कबूल करण्याचेही धाडस या सरकारमध्ये नाही. परंतू पाण्याच्या बाबतीत मराठवाड्यातील नेते उदासीन व जनतेला तर काहीच कळत नाही या गोष्टींचा गैरफायदा घेऊन आपले मराठवाड्याप्रतिचे बेगडी प्रेम जलसंपदा मंत्र्यांनी कोकणातील पाणी विसरण्यासाठी ४५ वर्षांपासून हिशोबात झालेली चुक दुरुस्त केल्याचे कारण दाखवून हे १९.२९ टीएमसी पाण्याचे गाजर दाखविले असल्याचे मराठवाडा राज्य संघर्ष समितीच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सदस्य शिवाजी कवठेकर यांनी म्हटलेले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!